शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी नेमले ७ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:54 IST

भडगावची घटना: २५ कर्मचारी लागले जोरदारपणे कामाला

भडगाव : एकाच कुटुंबातील तिघांच्या फाशीच्या घटनेच्या ‘सुसाईड नोट’ वरून याच कुटुंबातील बालकाच्या खुनाच्या गुन्ह्याचा २४ तासाच्या आत उलगडा झाल्यानंतर पोलिसांची तपासचक्रे आता खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शोधण्यासाठी वेगाने फिरत आहेत. यासाठी ७ पथके नेमण्यात आली आहेत.पोलीस महानिरीक्षकयांनी फिरवली तपासाची सूत्रेटोनगाव भागातील बांगडी विक्रेते सैय्यद यांच्या कुटुंबात सर्व तिघांनी आत्महत्या केल्यानंतर भडगाव येथे ३१ मार्च रोजी नासिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी भेट दिली. भडगाव येथे तब्बल ४ तास पेक्षा जास्त वेळ पोलीस महानिरीक्षक यांनी ठाण मांडल्याची पहिलीच वेळ होती. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा भडगाव पोलीस ठाण्या बाहेर होता. छावणीचे स्वरूप येथील परिसरात निर्माण झाले होते. दरम्यान पोलीस महानिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन घराची पाहणीही केली.वडील, आई आणि बहिण या तिघांच्या आत्महत्या या बालकाच्या मृत्यूशी निगडीत असून अनैसर्गिक कृत्यातून झालेला बालकाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी ७ पोलीस पथके तयार केली आहेत. त्यांच्याकडे नागरिक, बालक/ महिलांकडून माहिती घेणे, संगणक विभाग, वाहन यंत्रणा, बाहेरील व गावातील फिरते पथक नेमून विविध कामे सोपविण्यात आली आहेत. या नेमलेल्या पथकात २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .तिसरी सुसाईड नोटपोलिसांना मयतांच्या घरातुन अधिक तपासणीत एकाच विषयाच्या एकूण ३ सुसाईड नोट मिळून आल्या . २ त्यांच्या जवळ व १ घरात सुसाईड नोट मिळाली. त्यात मुलाच्या मृत्यू नंतर घरमालक देत असलेला त्रास व मुलाच्या खुनाचा गुन्हा उघड होत नसल्याच्या विरहात आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आरोपींची कसुन चौकशी केली असता मयत बालक इशानच्या शवविच्छेदनासाठी १५ हजार रुपये त्याच्या पालकाकडून घेतल्याची कबुली दिली. तसेच या बालकाच्या मारेकऱ्यांचा लवकरच शोध लावु असा विश्वासही पोलीस निरीक्षक येरुळे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी