शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जळगावात चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या ७ सोनसाखळ्या हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 9:50 PM

 शहर व जिल्ह्यातून ११ ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा-या तिन्ही चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या सात सोनसाखळ्या, ४ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजाराची दुचाकी असा ३ लाख ७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या तिन्ही चोरट्यांना पोलीस ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे सात गुन्ह्यांची कबुली ओळख परेडमध्येही ओळखले महिलांनीगुन्हे आढावा बैठकीत कौतुक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ६  :  शहर व जिल्ह्यातून ११ ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा-या तिन्ही चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या सात सोनसाखळ्या, ४ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजाराची दुचाकी असा ३ लाख ७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या तिन्ही चोरट्यांना पोलीस ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.शेंगोळा, ता.जामनेर येथील यात्रेत पैशांची उधळपट्टी करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर आलेल्या करण प्रल्हाद मोहीते ( मुळ रा.तरवाडे, ता.चाळीसगाव), दीपक रेवाराम बेलदार (मुळ रा.खडकी-बोरगाव, ता.बोदवड) व दिनेश गजेंद्र मोहीते ( मुळ रा. तळेगाव, ता. जामनेर) तिन्ही ह.मु. पिपरीया, ता.वापी, जि.बलसाड, गुजरात यांच्या मुसक्या गेल्या महिन्यात आवळण्यात आल्या होत्या. दरम्यान, पोलीस कोठडीचा हक्क राखून या तिघांची कारागृहात रवानगी झाली होती. या काळात तहसीलदारांसमोर ओळख परेड झाली असता त्यात दोन महिलांनी या चोरट्यांना ओळखले होते. 

दागिने जसेच्या तसेचपोलीस कोठडीत असताना पोलिसांनी या तिघांना ‘खाकी’ हिसका दाखविला असता त्यांनी १२७ ग्रॅम दागिने काढून दिले. ज्या पध्दतीने सोनसाखळ्या व मंगलपोत लांबविण्यात आल्या होत्या अगदी जशाच्या तशा अर्धवट तुटलेले दागिने त्यांच्याकडे आढळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व  चोरीचे ४ मोबाईलही आढळून आले. या तिघांचा साथीदार मच्छिंद्र पवार (रा.सिल्वासा, गुजरात) हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले आहे.

गुन्हे आढावा बैठकीत पथकाचे कौतुकसोनसाखळी लांबविणा-या टोळीला पकडण्यासह मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक केले. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, राजेंद्र होळकर, सागर शिंपी, उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, मुरलीधर अमोदकर, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र घुगे, विनोद पाटील, नारायण पाटील, रवींद्र पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, सतीश हळणोर, अशोक चौधरी, बापु पाटील, विलास पाटील , दत्तू बडगुजर, महेंद्र पाटील, जयंत चौधरी, गफूर तडवी, अशोक पाटील व दर्शन ढाकणे यांचा समावेश आहे.