धुळे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी 7 आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. कदम यांनी सोमवारी प्रत्येकी 20 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. तिखी, ता.धुळे शिवारातील डेडरगाव तलाव परिसरात 24 सप्टेंबर 2013 रोजी हे सामूहिक बलात्कार प्रकरण घडले होते. धुळे जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच बलात्काराच्या गुन्ह्यात एकाच वेळी 7 आरोपींना 20 वर्ष कैदेची शिक्षा झाली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये राहुल भास्कर गावडे, राजू उर्फ किरण दगडू गावडे, महेश शिवदास गावडे (चौघे रा.मोहाडी, ता.धुळे), संतोष रोहिदास बोरसे, एकनाथ रामदास पवार, चंदर दशरथ उर्फ एकनाथ मोरे व धर्मा भगवान अहिरे (सर्व रा.इंदिरानगर, रानमळा, ता.धुळे) यांचा समावेश आहे. याशिवाय एका अल्पवयीन आरोपीचा खटला बालन्यायालयात आहे. मोहाडी परिसरातील रामनगरात राहणा:या या 16 वर्षीय मुलीवर या आरोपींनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कार करून आरोपींनी त्याचे भ्रमणध्वनीत चित्रीकरणदेखील केले होते. ते चित्रीकरणदेखिल तपासाच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरले होते. कायद्याच्या कचाटय़ात फसले ! 430 सप्टेंबर 2013 रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून सर्वच आरोपींविरुद्ध प्रभावी आणि पुराव्यानिशी सिद्ध होतील, अशी कलमे लावण्यात आली. 4भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 376 (ड), 376/2 (एच), 323, 504, 506 सह लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम क्रमांक 32 सन 2012 चे कलम 3, 4, 6 सह अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 चे कलम 3 (3), (11), (12) व माहिती तंत्रज्ञान कायदा सन 2000 कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 4न्यायालयासमोर सर्वच गुन्हे सिद्ध झाल्याने तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे.
7 नराधमांना 20 वर्ष कैद
By admin | Updated: December 1, 2015 00:28 IST