शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कंटेनमेंट झोनमध्ये ६८ हजाराची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 20:35 IST

जळगाव : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेल्या नेहरु नगरात हेमंत सुभाष भंगाळे यांच्या बंद घराचे कुलुप ...

जळगाव : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेल्या नेहरु नगरात हेमंत सुभाष भंगाळे यांच्या बंद घराचे कुलुप व कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख व १८ हजाराचे दागिने असा ६८ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेंमत भंगाळे हे आरटीओ कार्यालयाजवळ पावभाजी व चायनिज खाद्य पदार्थाचा व्यवसाय करतात. वडील सुभाष लक्ष्मण भंगाळे, आई अलका,पत्नी वैष्णवी व मुलगा असे ते परिवारासह नेहरु नगरात दत्त मंदिराजवळ वास्तव्याला आहेत. नेहरु नगरात कोराना बाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाला होता. १२ जून रोजी हा भाग खुला झाला. त्यामुळे त्याच दिवशी पत्नी व मुलासह हेमंत हे नेरी, ता.जामनेर या मुळ गावी गेले तर आई, वडील आधीच गेलेले होते. बॅँकेच्या कामकाजासाठी पत्नीचे काही कागदपत्रे लागणार असल्याने हेमंत हे बुधवारी दुपारी घरी आले. लोखंडी गेटचा दरवाजा उघडून आत गेले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तुटलेला होता तर घरातील बेडरुम व इतर खोल्यांमधील कपाट उघडे होते तसेच साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील ४० हजाराची रोख रक्कम व  १८ हजार रुपये किमतीच्या तीन ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या चोरी झाल्याचे समजले. आईच्या कपाटातील दागिने व रोख रक्कम देखील गायब झाली असून ती नेमकी किती हे आई घरी आल्यावरच स्पष्ट होईल. हा प्रकार उघड झाल्यानंतर हेमंत भंगाळे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार रामकृष्ण पाटील करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव