शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

‘आरटीई’ च्या ३७१७ जागांसाठी ६ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:54 IST

२५ टक्के प्रवेश, ३० मार्चपर्यंत वाढविली मुदत

ठळक मुद्दे६ हजार १४५ अर्जांची नोंदणी

जळगाव : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांसाठी तेरा दिवसात आतापर्यंत ६ हजार १४५ अर्जांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. आता पुन्हा शासनाकडून आॅनलाइन अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे़ यासह वयाची मयार्दा वाढली आहे. आतापर्यंत बालकाचे वय किमान ६ वर्ष व कमाल वय ६ वर्ष ११ महिने २९ दिवस होते. परंतु समग्र शिक्षा अभियानातर्फे आता कमाल वय ७ वर्ष २ महिने २९ दिवस करण्यात आले आहे.आरटीईच्या आॅनलाईन प्रवेशाला ५ मार्चपासून सुरूवात झाली होती़ मात्र, पहिल्याच दिवशी पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला़ रात्री १०़३० वाजता आरटीईचे पोर्टल सुरळीत झाल्यानंतर ६ मार्चपासून पालकांना आॅनलाइन अर्ज करण्यास सुरूवात केली़ पोर्टलवर आॅनलाइन बरोबरच मोबाइल अ‍ॅपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पालकांकडून मोबाइल अ‍ॅपचा फारसा वापर केला जात नसल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील फक्त १४ पालकांनी मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे़ तसेच पालकांना आरटीईच्या २५ टक्के प्रवेशाची अर्ज करण्याची तारीख ५ ते २२ मार्च पर्यंत देण्यात आली होती़ परंतु अर्ज करण्याची तारीख ३० मार्च करण्यात आली आहे.प्रवेश नाकारल्यास कारवाईपालकाला प्रवेश नोंदणी करताना १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा अधिक अंतरातील फक्त १० शाळा निवडता येतील. परंतु प्रत्यक्ष एकच शाळेला प्रवेश मिळणार आहे. सदर कालावधीमध्ये पालकाने आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करायचे आहे. अन्यथा पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही. कोणत्याही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. २५ टक्के प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश मिळाल्यानंतर तसा एसएमएस शाळांना व पालकांना पाठविण्याची व्यवस्था राहील. पालकांचे संपर्क क्रमांक प्रवेश नोंदणी करतेवेळी घालणे आवश्यक असतील.६ हजार १४५ अर्जांची नोंदणी... आरटीईतंर्गत इयत्ता पहिलीमध्ये जिल्ह्णातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे़ यासाठी यंदा तीन फेऱ्या राबविण्यात आल्या आहेत़ यंदा तेरा दिवसात पोर्टलवर ३७१७ जागांसाठी आतापर्यंत तब्बल ६ हजार १४५ अर्जांची नोंदणी झाली आहे़ आता अर्जांच्या नोंदणीसाठी ३० मार्चपर्यंत मुदत वाढविली असल्यामुळे या संख्येमध्ये आणखीन मोठ्या संख्येने वाढ होण्याच्या शक्यता आहे़

टॅग्स :Educationशिक्षण