शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या नादात गमविले ६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:13 IST

वडीलांचे पैसे देण्यासाठी केला बालकाचा अपहरणाचा प्लॅन

जळगाव : युवकाने मोबाईलवर गेम खेळताना वडीलांच्या बँक खात्यातून सुमारे ६ लाखांची रक्कम गमविल्यानंतर ती रक्कम वडीलांना परत कशी करावी, या तणावात असलेल्या त्या युवकाने चक्क एका अपार्टमेंटमधील घरात प्रवेश करीत बालकाच्या गळ्याला चाकू लावून महिलेला पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला आहे़ पोलिसात याबाबत कुठलीही तक्रार दिलेली नसल्यामुळे या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद नाही़रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दतील रहिवासी २० वर्षीय सुनील (नाव बदलेले) हा युवक डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे़ शिक्षक असलेल्या वडिलांच्या बँक खात्यात सहा लाख रूपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा होती़ सुनील याने वडीलांच्या मोबाईलमध्ये आॅनलाईन गेम खेळतांना बँक खात्यातून तब्बल ६ लाख गमविले. हा प्रकार सुनीलच्या वडीलांच्या लक्षात आला़ बँकेतील पेैशांबाबत त्यांनी सुनीलला विचारले़ त्याने लवकरच पैसे परत येतील असे वडीलांना सांगितले़ मात्र, पैसे परत न आल्यामुळे वडीलांनी वारंवार पैशांबाबत विचारणा केल्यामुळे सुनील हा तणावात होता़अन् रचला चोरीचा प्लॅनवडीलांना पैसे परत करायचे असल्याने त्याने चोरीचा प्लॅन रचला. परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एका गृहस्थाच्या सुनीलने घरात प्रवेश करून ६ वर्षीय बालकाच्या गळ्याला चाकू लावला. अन् बालकाच्या आईला घरातील जितके पैसे असतील तितके घेवून या नाहीतर मुलाला मारून टाकेल अशी धमकी दिली़महिलेने आरडाओरड करताच नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला.तक्रार देण्यास दिला नकारमहिला प्रचंड घाबरलेली असल्याने महिलेने पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी सुनीलच्या वडीलांना फोन करून घटनेची माहिती दिली़ काही वेळानंतर युवकाच्या वडीलांनी पोलीस स्टेशन गाठले़ मात्र, महिलेने तक्रार न दिल्याने याबाबत पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी