शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 19:27 IST

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ साचल्याचे ‘मेरी’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे महत्वाच्या प्रकल्पावर ओढवली परिस्थिती ‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर

आॅनलाईन लोकमतवरणगाव, ता. भुसावळ, दि.२ : जळगाव जिल्हयातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ‘मेरी’ या संस्थेने मार्च २०१७ साली केलेल्या सर्वेक्षणात धरणाच्या साठवण क्षमतेच्या निम्म्यापेक्षा अधिक भाग गाळाने व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे.‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार हतनूर प्रकल्प उभारणीपासून गेल्या ३५ वर्षात धरणात ५४ .४५ टक्के गाळ जीवंत पाणी साठ्यात गोळा झाला आहे . यापूर्वी ‘मेरी’ने २००७ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार त्या वेळी धरणातील मृत पाणीसाठ्यात ८१ टक्के गाळ साचला होता. वेळीच धरणातील गाळ उपसला गेला असता तर आज ही वेळ आली नसती असे जाणकाराचे मत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यातील एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पावर ही परिस्थिती ओढवली आहे. हतनूर धरणाची ३८८ दश लक्ष घनमिटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यात २०८ दशलक्ष घनमिटर गाळ साचल्याने प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर आली आहे., आणि तीच मोठी भविष्याच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.कृषी सिंचनावर परिणामसातत्याने धरणात गाळ साचत राहिल्याने त्याचा फटका कृषी सिंचनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. धरण उभारणीपासून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनाकरिता ७० दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून तापी नदी व कालव्याव्दारे सोडले जात असे. परंतु ते कमी होवून फक्त रब्बी हंगामासाठी १८ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सिंचनास पाणी मिळत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. तर धरणातून (औद्योगिक पुरवठा ) बिगर सिंचनाकरिता ९४ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते. अशीच परिस्थिती राहिल्यास जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्हयात कृषी सिंचन व उद्योगावर दुष्परिणाम होईल.खर्चाची मोठी डोकेदुखीजाणकारांच्या मते आता धरणालील गाळ काढण्याकरिता येणाºया खर्चात नविन प्रकल्प उभा राहिल. एवढा यावर पैसा खर्च होईल.

टॅग्स :Damधरण