शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात प्रचारफेऱ्यासाठी ५०० रूपये रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:04 IST

मनपा निवडणुकीतील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज किमान ५ लाखांपर्यंत काही कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन प्रचार ५ लाखातप्रचार कंपन्यांकडून ग्राहकांचा शोधअनेक उमेदवारांकडून प्रचारासाठी होकार

जळगाव : मनपा निवडणुकीतील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज किमान ५ लाखांपर्यंत काही कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. अगदी सांगली-मिरज निवडणुकीचे काम घेतलेल्या पुण्याच्या कंपनीने जळगावातही ग्राहक शोधणे सुरू केले आहे. प्रचारफेरीत गर्दीसाठी ५०० रूपये रोजाने माणसेही पुरविण्याची तयारी या कंपनीने ठेवली असून अनेक उमेदवारांकडून त्यासाठी होकारही दर्शविण्यात आला आहे.यंदाच्या मनपा निवडणुकीत प्रभागांची रचना मोठी झाली असून एकाच प्रभागातून चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दोन प्रभाग मिळून एक प्रभाग झाला आहे.एवढ्या मोठ्या प्रभागात पोहोचण्यासाठी तुलनेने प्रचाराला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार असल्याने यंदा आॅनलाईन प्रचारावरच उमेदवारांचा अधिक भर राहणार आहे. हेच हेरून पुण्याची एक कंपनी देखील या प्रचार कार्यात उतरली आहे.कंपनीचे प्रतिनिधी पक्ष कार्यालयांमध्ये फिरून उमेदवारांना गाठून आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज चार ते पाच लाखांत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवित आहे.काय आहे पॅकेज?या आॅनलाईन प्रचारासाठी कंपनीकडून खास तयार केलेले सॉफ्टवेअर उमेदवाराला दिले जाणार असून संबंधीत प्रभागातील उमेदवारांची यादी फोननंबरसहीत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच त्याचा वापर करण्यासाठी मॅनपॉवरही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याद्वारे उमेदवारांना थेट एसएमएसद्वारे संपर्क साधून मतदानाचे आवाहन करता येणार आहे. तसेच व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आदी सोशलमीडियावर प्रचारासाठीही मदत केली जाणार आहे. त्यासाठीचे प्रचारसाहित्यही उमेदवाराला तयार करून दिले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी बुथवर मदतीसाठी देखील कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.याखेरीज स्थानिक मक्तेदारही उमेदवारांना रॅलीसाठी, प्रचारासाठी माणसे पुरवित असतात. सकाळी घरातून निघाले की उमेदवार नाश्ता, पाण्याची सोय करतो. त्यानंतर दिवसभर प्रभागात फिरून प्रचार करायचा आणि पैसे घेऊन सायंकाळी घरी परतायचे असा काहींचा दिनक्रमच होऊ जातो.

टॅग्स :JalgaonजळगावPoliticsराजकारण