शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:05 IST

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यातनदी पात्रात तलाव सदृष्य खड्ड्यांमध्ये जमिनीत जिरविले जाते पाणी१०० टक्के वृक्ष संगोपन

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात तालुक्यात जलपातळी खोल जात असल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने अनेकांना पाणी अडवा-पाणी जिरवा योजनेसह वृक्ष लागवडीची आठवण होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा पुढील उन्हाळ्यापर्यंत त्यावर कोणीही बोलत नसल्याची गेल्या अनेक उदाहरणे आहेत. मात्र तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून नदी पात्रात जलबंधारे आणि लाखो लीटर्स पाणी जिरविण्यासाठी सुरू केलेली योजना या वर्षातही सुरू ठेवली असून, गेल्या वर्षी ४० तर या वर्षात सात अशी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली असल्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्या पाठोपाठ आता तालुक्यात अनेक गावात या योजना सूर झाल्या आहेत.यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी बुद्रूक येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या वर्षी नदी परिसरात ४० जलसंधारणाची कामे केली. यात प्रामुख्याने माती बंधारे लाखो लीटर्स पाणी मावेल असे मोठमोठे तलाव सदृष्य खड्डे तयार करणे यासारखी कामे केली होती. त्याचा फायदा या गावासाठी निश्चितच झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तालुक्यात अनेक गावांना यावर्षी पाणीटंचाई उद्भवली. मात्र सांगवीमध्ये पाणीटंचाई नाही. गावचे सांडपाणीसुद्धा नदी पात्रातील खड्ड्यामधून जिरविले जात आहे.गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षातही ग्रामस्थांनी लोकसहभागतून मागील वर्षाचे सहा खड्डे पुनरुज्जीवित करून नव्याने १०० बाय ५० बाय १२ फूट ज्यात १७ लाख १७ हजार लीटर्स पाणी मावेल, तर दुसरा २३१ बाय २७ बाय १२ फुटांच्या खोलीचा ज्यात ३२ लाख ७० हजार लीटर्स पाणी मावेल, आणि तिसरा ११२ बाय २७ बाय १० फूट खोलीचा आठ लाख ७० हजार लीटर खोलीचे तलाव सदृष्य खड्डे केले आहेत.मागील वर्षाचे आणि या वर्षाचे मिळून ग्रामस्थांनी परिसरात ५० जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी ग्रामस्थांनी मागील वर्षी सुमारे सात लाखांचा निधी जमा केला होता. त्यातील पाच लाख जलसंधारणावर खर्च केले तर एक लाख रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केले.१०० टक्के वृक्ष संगोपनशासकीय यंत्रणेव्दारा दरवर्षी लाखो वृक्ष लागवड होते आणि दुसऱ्या वर्षी परत त्याच खड्ड्यातून वृक्ष लागवड होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र सांगवीकरांनी गेल्या वर्षी गावात केवळ १२६ वक्ष लावले.वृक्ष लागवड करताना एक हजार रुपये, दीड हजार रुपये किमतीची मोठी झाडे आणून त्यांचे संगोपन केल्याने १०० टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाल्याचे तलाठी एस.के.पाटील यांनी सांगितले. या योजनेसाठी गावातील अमोध कोळंबे, अतुल उल्हास चौधरी, दीपक चौधरी, पी. एम. भंगाळे, दीपक भंगाळे, योगेश भंगाळे, विकास भंगाळे, भालचंद भंगाळे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे तलाठी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल