आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१ : आयोध्या नगरातील गर्ग टाईल्स अॅण्ड प्लायवूड या दुकानातील काऊंटरमधून चोरीला गेलेल्या ५० हजार रुपयावर नोकराने डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. मिलिंद गोकुळ पाटील या नोकराने हा प्रताप केला असून त्याला पोलिसांनी खेडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, चोरलेले ५० हजार रुपये रविवारी त्याच्याकडून वसूल करण्यात आले आहे.आयोध्या नगरातील महावीर अपार्टमेंट येथे नवीन अनिल अग्रवाल यांच्या मालकीचे गर्ग टाईल्स अॅण्ड प्लायवूड नावाचे शोरुम आहे. मिलिंद पाटील हा या शोरुममध्ये कामाला आहे. या शोरुमध्या काऊंटरमधून ५० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली होती. याप्रकरणी अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.संशयावरुन उचलले नोकरालागुन्हा दाखल झाल्यानंतर ही रक्कम नोकर मिलींद याने चोरल्याचा संशय अग्रवाल यांनी वर्तविला होता. त्यामुळे पोलीस उपनिरिक्षक एन.बी. सुर्यवंशी, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर यांनी मिलींद पाटील याचा शोध घेतला असता तो खेडी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला मध्यरात्री ताब्यात घेतले. ‘खाकी’ स्टाईल हिसका दाखविल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. दरम्यान, रविवारी सकाळी त्याने चोरलेली रक्कमही परत केली.
जळगावात स्टाईलच्या शोरुममध्ये नोकरानेच मारला ५० हजारावर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 15:05 IST
आयोध्या नगरातील गर्ग टाईल्स अॅण्ड प्लायवूड या दुकानातील काऊंटरमधून चोरीला गेलेल्या ५० हजार रुपयावर नोकराने डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. मिलिंद गोकुळ पाटील या नोकराने हा प्रताप केला असून त्याला पोलिसांनी खेडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, चोरलेले ५० हजार रुपये रविवारी त्याच्याकडून वसूल करण्यात आले आहे.
जळगावात स्टाईलच्या शोरुममध्ये नोकरानेच मारला ५० हजारावर डल्ला
ठळक मुद्देचोरलेली रक्कम वसूलएमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलसंशयावरुन उचलले नोकराला