शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांच्या दिमतीला येणार ५० ई-बस! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2023 18:54 IST

महानगरपालिकेच्यावतीने शहरालगतच्या २० किलोमीटर अंतरात सेवा देण्यासाठी ई-बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.

कुंदन पाटील 

जळगाव : महानगरपालिकेच्यावतीने शहरालगतच्या २० किलोमीटर अंतरात सेवा देण्यासाठी ई-बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्याठी पीएम बससेवा योजनेंतर्गत ५० बसगाड्या मनपाला मिळणार आहेत. बसस्थानकासाठी मनपाने जागेची मागणी केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या बसस्थानकासह अन्य पर्यायी जागांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही जागांची पाहणीही केली.

शहरात महापालिकेच्यावतीने बससेवा सुरु करण्याच्या प्रस्तावाला दि.२३ ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दि.१ सप्टेंबर रोजी एक पत्र दिले. पीए योजनेंतर्गत ५० बसेस जळगावात दाखल होणार आहेत. या बसेसच्या थांब्यासाठी, देखभालीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या बसस्थानक, छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल परिसर, सामाजिक न्याय भवनासह अन्य जागांची पाहणी केली.जागेसाठी शोधमोहिम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महसुल विभागाचे तहसीलदार पंकज लोखंडे यांनी शहरातील जागांसंदर्भात चर्चा केली. त्यानुसार सद्यस्थितीला चार जागांवर प्रशासन विचार करीत आहे.

या जागांचा विचार

  • १) महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार जुने बसस्थानकाची जागा योग्य राहील. ही जागा ताब्यात घेतल्यास बससेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपालाही सोयीस्कर पडणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही या जागेला प्राधान्य दिले आहे.
  • २) छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलाभोवती असलेल्या जागेचाही जिल्हा प्रशासन विचार करीत आहे.
  • ३)अजिंठा चौफुल परिसरातील एस.टी.महामंडळाच्या जागेवर वाहनतळासाठी मोठी जागा आहे. रात्रीतून बसेस त्याठिकाणी मुक्कामी थांबवायच्या आणि सेवा देण्यासाठी जुन्या बसस्थानकाच्या जागेचा वापर करायचा, असेही जिल्हा प्रशासनाचे मत आहे.
  • ४) मनपाच्या हद्दीत खुला भूखंड असल्यास त्याचा शोध घ्यायचा आणि तो सोयीस्कर असल्यास त्याठिकाणाहून बससेवा सुरु करायची, असाही एक प्रस्ताव प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवला आहे.
टॅग्स :Jalgaonजळगाव