शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात ५० टक्के मृत्यू मधुमेहामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:35 IST

२७ वर्षीय तरुणाच्या मृत्यू

आनंद सुरवाडेजळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी समितीकडून याचे परीक्षण केले जाते. यात ५३३ मृत्यूचे परीक्षण केल्यानंतर यातील २७० रुग्णांना अर्थात ५०.६६ टक्के लोकांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. रविवारी झालेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यू यकृत निकामी  झाला असे कारण डॉक्टरांनी नोंदविले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आकडेवारीनुसार ३५४ पुरुष व १७९ महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृतांमधील ४०४ रुग्णांना विविध व्याधी होत्या, तर १२९ रुग्णांना कसल्याही व्याधी नव्हत्या. मात्र, वय अधिक असणे आणि वेळेवर रुग्णालयात न येणे अशी त्या मागे काही कारणे नोंदविली आहेत. तरुणाचा मृत्यू, तज्ज्ञांना काय वाटते?जळगाव शहरातील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या तरुणाचे यकृत निकामी झाले होते. मुळात तो कोरोना म्हणून नव्हे, तर हेपेटायटीसमुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला दम लागत होता, अन्य लक्षणे नव्हती, त्याची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.  यकृतात प्रोटिन्स तयार होतात, यामुळे प्रतिकारक्षमता वाढते, मात्र, हे प्रोटिन्स तयार न झाल्याने प्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय यकृत खराब झाल्याने विषारी पदार्थ मेंदूत जातात व त्याच्यामुळे रुग्णाला दम लागतो, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली. 

टॅग्स :Jalgaonजळगाव