शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी मध्यरात्रीपासून ५ हजारावर एस़ टी क़र्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 15:25 IST

कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत नेहमीच शासनाकडून आश्वासनांचा पाऊस पडतो़ मात्र मागण्या पूर्ण होत नाही़ या मागण्या मान्य होईपर्यंत एस़. टी. क़ामगारांनी बेदमुत संपाचे हत्यार उपसले आहे़

ठळक मुद्देऐन दिवाळीत प्रवाशांचे चांगलेच हाल होणारसोमवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवातएकही एसटी आगारातून बाहेर पडणार नाही़

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१५-कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत नेहमीच शासनाकडून आश्वासनांचा पाऊस पडतो़ मात्र मागण्या पूर्ण होत नाही़ या मागण्या मान्य होईपर्यंत एस़. टी. क़ामगारांनी बेदमुत संपाचे हत्यार उपसले आहे़ सोमवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील एकाही आगारातून एस़टी़बाहेर निघणार नाही, अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली़

ऐन दिवाळीतील या आंदोलनामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहे़काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला एस़टीक़ामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चांगरे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, विभागीय सचिव योगराज पाटील, डेपो अध्यक्ष सोपान सपकाळे,  इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत, जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीधर चौधरी, एस़टी़पतपेढीचे संचालक मनोज सोनवणे, जगपालसिंग गिल, दिनेश महाशब्दे,  प्रसिध्द प्रमुख संदीप सुर्यवंशी, कामगार संघटनेचे प्रसिध्द प्रमुख विनोद शितोळे आदी उपस्थित होते़

सोमवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवातसोमवारी मध्यरात्री जळगाव आगारासह जिल्हाभरातील आगार, एसटीवर्कशॉप येथे मंडप टाकण्यात येणार असून आंदोलनाला सुरुवात होणार आहे़ वाहन, चालक तसेच यांत्रिक विभागातीलअसे एकूण जिल्हाभरातील ५६०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत़ दोन महिन्यांपासून आंदोलनाबाबत शासनाला कायदेशाीर नोटीस देण्यात आली होती़ मात्र तरीही दखल न घेतल्याने राज्यव्यापी आंदोलनाची भुमिका घेण्यात आली आहे़ आंदोलनादरम्यान एकही एसटी आगारातून बाहेर पडणार नाही़ ऐन दिवाळीत होत असलेल्या आंदोलनामुळे संघटना पदाधिकाºयांनी प्रवाशांकडे संघटना पदाधिकाºयांनी दिलगीरी व्यक्त केली आहे़ आंदोलनाला विदर्भ कामगार संघटना, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना, संघर्ष गृप अशा विविध संघटनांनी पाठींबा दिला असल्याचेही यावेळी सुरेश चांगरे यांनी सांगितले़अशा आहेत मागण्या१ एप्रिल २०१६ पासून एस़टीक़र्मचाºयांना राज्यातील शासकीय कर्मचाºयांप्र्रमाणे वेतनश्रेणी, वेतन, विविध भत्ते, सेवा-सवलतीसह व सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, १ जुलै २०१६ पासून वाढीव ७ टक्के महागाई भत्ता तसेच जानेवारी २०१७ पासून वाढीव ४ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ अदा करावी, संप, बंद, आंदोलन, उपोषण इत्यादीप्रकरणी गैरहजर राहणाºया कर्मचाºयांना वेतन कपातीचे काढलेले बेकायदेशी परिपत्रक रद्द करण्यात यावे, पदनिहाय नवीन वेतनश्रेणी निश्चित करावी,  यांत्रिक कर्मचाºयांना ग्रेडेशना लाभ देण्यात यावा,  निलंबित करताना महामंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यात यावी, गणवेशाचा कापड व शिलाई भत्ता तत्काळ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेदमुत संप करण्यात येत आहे़