शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

स्वस्त धान्य दुकानावरून मिळणार 5 किलो वजनाचे सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:12 IST

दुकानदारांच्या नफ्यात वाढ : जिल्ह्यात 1921 स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनचे वाटप

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17  -  राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 1921 स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिन वाटप करण्यात आले असून त्यास दुकानदारांचाही चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. धान्यासह आता हे दुकानदार 5 किलो वजनाचे 20 गॅस सिलिंडर विक्री करू शकतील, अशीही माहिती जाधव यांनी दिली. ई-पॉस मशिनद्वारे धान्याचा काळा बाजारास आळा बसण्यास मदत होणार असल्याने सर्वत्र याचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार जुलै महिन्यात 2 लाख 63 हजार कार्ड धारकांना तर ऑगस्ट महिन्यात 3 लाख 54 हजार कार्ड धारकांना ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप झाले. सप्टेंबर महिन्यात  साडेचार ते पाच लाख कार्ड धारकांना ई-पॉसद्वारे धान्य वाटप करण्याचे उद्दीष्ट असल्याची माहिती जाधव यांनी दिली.  पारोळा तालुक्यात 92 टक्के तर रावेर तालुक्यात 90 टक्के धान्य वाटप ई-पॉस मशिनद्वारे झाले असल्याचेही ते म्हणाले.   नफ्यामध्ये वाढरेशन दुकानदारांच्या नफ्यामध्ये (कमिशन) 70 रूपयांवरून 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. सोबतच हे दुकानदान मान्यताप्राप्त बियाण्यांची विक्रीही या दुकानात करू शकतील. सोबतच विनाअनुदानीत कितीही प्रमाणात रॉकेलची विक्री करू शकतील. या रॉकेलचे दर 40 ते 45 रुपये प्रति लिटर राहतील, असे सांगण्यात आले. 

साखरेत कपातपूर्वी बीपीएल (दारिद्र रेषेखालील कुटुंब) व अंत्योदय या रेशन कार्ड धारकांना प्रती व्यक्ती पाचशे ग्रॅम साखर मिळत होती. आता शासनाने ‘बीपीएल’ची साखर बंद केली आहे. दोन्ही योजनेतंर्गत 6 हजार 301 क्विंटल साखरेचे नियतन शासनाकडून येत होते. आता केवळ अंत्योदय योजेनेतील कार्ड धारकांना प्रती कार्ड एक किलो साखर मिळेल. त्यासाठी एक हजार 375 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झालेले आहे.

आधार संलग्न कराशिधापत्रिकेशी आधार संलग्न करणे  गरजेचे असून  ते नसेल तर धान्य मिळू शकणार नाही. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचे आधारकार्ड शिधापत्रिकेशी संलग्न करा आणि ते संलग्न झाले किंवा नाही याबाबत आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधावा, असे आवाहनही जाधव यांनी केले.