लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शनिवारी विक्रमी ४९ हजार लसीकरण झाले मात्र, त्यानंतर रविवारी मात्र, लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला. त्यातच सोमवारी आता जिल्ह्यातील केंद्रांवर ४८१० डोस शिल्लक आहेत. मात्र, शहरातील केंद्रांवर एकही डोस नसल्याने केंद्र बंद राहणार आहेत. लसींची उपलब्धता झाल्यानंतर मोहिमेला गती येत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ८ लाख ८३ हजार ४४४८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर ३ लाख १० हजार २९१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात जळगाव शहरातील १ लाख ५३ हजार ४२० नागरिकांनी पहिला तर ६७ हजार ४७६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरी व ग्रामीण भागात जवळपास सारखेच लसीकरण झाले आहे. जळगाव शहरात सर्वाधिक लसीकरण नोंद करण्यात आली आहे.