जळगाव शहर व परिसरात कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे शहरवासीय भयभीत झाले आहे. मोकाट कुत्रे कधी चावा घेतील याची शाश्वती राहिलेली नसून जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यात ४ हजार ५५१ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये मे महिन्यात सर्वाधिक ७०० जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला.जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढतानाच दिसून येत आहे. दररोज शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात मोकाट कुत्रे नागरिकांवर हल्ला करीत आहेत. पूर्वी कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना क्वचित घडत होत्या. मात्र शहरातील सध्याची स्थिती पाहिली असता त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे शहरवासीय भयभीत झाले आहेत.गेल्या आठवड्यात गोपाळपुरा भागात पिसाळलेल्या कुत्र्यांनी एका ७ वर्षीय बालकावर हल्ला चढवत त्याच्या नाकाचा लचका तोडला तर त्याच्या बहिणीसही कुत्र्याने चावा घेतला होता. गोपाळपुरातील या थरारक घटनेने कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना मनपाकडून पुरेसा उपाययोजना होत नसल्याचा आरोप होत आहे.मुलांना बाहेर खेळू देणे धोक्याचेमोकाट कुत्रे लहान मुलांसह तरुण, वृद्ध, महिला या सर्वांवर हल्ला करीत आहे. लहान मुलांचे लचके तोडल्याच्या घटनांमुळे लहान मुलांना बाहेर खेळू देणे देखील धोक्याचे ठरत आहे. शिवाय शाळेतून येताना अथवा जातानादेखील त्यांच्यावर हल्ले होत आहे.कुत्र्यांनी बनविले बालकांना लक्ष्यजानेवारी महिन्यात ४८७ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात यात मोठी वाढ होऊन ही संख्या ६४८वर पोहचली. त्यानंतर मार्च महिन्यात ५५८, एप्रिल महिन्यान ४६५, मे महिन्यात ७००, जून महिन्यात ४३६, जुलै महिन्यात ३४८, आॅगस्ट महिन्यात ४३६ आणि सप्टेंबर महिन्यात ४७३ जणांना कुत्र्याने चावा घेतला. या मध्ये मे महिन्यात तर या संख्येने उच्चांक गाठला. याच महिन्यात ९ मे रोजी दादावाडी परिसरातील कल्याणीनगरातील १० वर्षीय बालिकेच्या डाव्या डोळ््याचा भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने तिच्या डोळ््याला ५० टाके पडले होते. या हल्यात डोळ््यासह हात व पायाचाही कुत्र्याने लचका तोडला होता व बालिकेच्या डोळ््याची शस्त्रक्रिया करावी लागली होती.
जळगावात ४५५१ जणांचे तोडले लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:12 IST
जळगाव शहर व परिसरात कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे शहरवासीय भयभीत झाले आहे.
जळगावात ४५५१ जणांचे तोडले लचके
ठळक मुद्देकुत्र्यांच्या दहशतीने जनता भयभीतमे महिन्यात ७०० जणांना चावाशहरात कुत्र्यांच्या हल्ल्यात झाली वाढ