जळगाव : शिरसोली नाक्याजवळील पारख संकुलातील भोईराज मेडिकल स्टोअर्स फोडून गल्ल्यातील ४५ हजार रुपये रोख आणि ५०० रुपये किंमतीचे साहित्य लांबविल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रावण नामदेव भोई (वय ३६) यांच्या मालकीचे शिरसोली नाक्याजवळील पारख संकुल अपार्टमेंटच्या दुकान क्रमांक १४ मध्ये भोईराज मेडिकल व जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर भोई व दुकानातील कामगार मुले घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दुकानात आले असता कामगार अरमान पटेल हा मुलगा शटर उघडत असतानाच त्याच्या लोखंडी पट्ट्या तुटलेल्या दिसल्या. त्यांनी हा प्रकार भोई यांना सांगितला असता त्यांनी आतमध्ये पाहणी केल्यावर दुकानात चोरी झाल्याची खात्री केली. गल्ल्यात ठेवलेली ४५ हजार रुपयांची रोकड व व इतर साहित्य गायब झाल्याचे दिसले. भोई यांनी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेडिकल स्टोअर्स फोडून ४५ हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 13:05 IST