शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रायपूरच्या दाम्पत्यास ४५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:14 IST

 दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देखोटे शपथपत्र केले तयार

जळगाव : कौशल्य विकास योजनेत सुरु केलेल्या प्रशिक्षण संस्थेचा खोटा ठराव करून आणि संस्था परस्पर स्वत:च्या नावावर करून रायपूरच्या दाम्पत्याची ४५ लाखात फसवूणक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी निमजाई फाऊंडेशनचे भूषण बक्षे, त्यांची पत्नी व अन्य चार अशा सहा जणांविरुद्ध शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला.भारती गजेंद्रसिंग परदेशी (३६ रा. रायपूर ता. जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली.भारती परदेशी यांनी २०१५ मध्ये कौशल्य विकास योजनेतंर्गत महाबळ कॉलनी परिसरातील मॅजिक वर्ल्ड आॅफ एज्युकेशन प्रशिक्षण केंद्रात अ‍ॅनिमेशनचा क्लास लावला होता. यादरम्यान केंद्राचे मालक भूषण बक्षे याने भारती यांचे पती गजेंद्रसिंग परदेशी यांच्याशी परिचय करून घेतला आणि परदेशी यांनाही प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत माहिती दिली. यानंतर मयुरेश्वर स्कूल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन नावाने रायपूर येथे प्रशिक्षण केंद्राची नोंदणी त्यांनी करून दिली.परदेशी यांचे मित्र अमित राजूसिंग चव्हाण यांना पिंप्राळा येथे दुसरे केंद्र सुरु करावयाचे असल्याने त्यासाठी बक्षे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी परदेशी यांचे मयुरेश्वर नावाचे प्रशिक्षण केंद्र बक्षे याने गणेश कॉलनी येथे परस्पर स्थलांतरीत केल्याचे समोर आले. याबाबत परदेशींनी विचारला असता ते माझ्या मालकीचे असून तुमचा काहीएक संबंध नसल्याचे बक्षेने उत्तर दिले. परदेशी यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मिळविली असता आपली फसवणूक झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी वरील सहा जणांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४७१, ४७४,१२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.खोटे शपथपत्र केले तयारभूषण बक्षे याने खोटे शपथपत्र शासनाला सादर केले तसेच संस्थेची बनावट कागदपत्रे बनावट स्वाक्षरी शिक्क्याच्या आधारावर तयार करुन त्याने परदेशी यांचे मयुरेश्वर स्कूल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन केंद्र परस्पर त्याची पत्नी शितल भगवान पाटील या अध्यक्ष असलेल्या निमजाई फाऊंडेशनच्या नावे लावले. यात स्वत: खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक देवून बक्षे, शीतल पाटील यांच्यासह निमजाई फाऊंडेशनचे सदस्य भारत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनी खोटा ठराव करुन अनुदानाची ४५ लाखांची रक्कम परस्पर खात्यावर जमा करुन घेतली.अनेकांना फसविल्याचा संशय !एरंडोल येथील प्रविण महाजन, धरणगाव येथील दीपक रतन पवार, सावखेडा बुद्रूक येथील अमित राजूसिंग चव्हाण यांच्यासह इतरांची फसवूणक झाल्याची माहिती फिर्यादी भारती परदेशी यांनी पोलिसांना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी