शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

४५ लाखाचा अपहार,तीन जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:40 IST

मुख्य संशयित फरार : ‘अटकपूर्व’वर खुलासा

जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी निमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४० रा.भवानी पेठ), राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या तिघांची चौकशी केली. या तिघांसह मोहीनी भरत भंगाळे (३१) अशा चौघांना औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या या अर्जावर पोलिसांनी मंगळवारी खंडपीठात खुलासा सादर केला.दरम्यान, यातील मुख्य संशयित भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील हे दोघं अद्याप फरारच असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. दोन वेळा पोलिसांचे पथक दोघांच्या घरी तसेच गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जावून आले, मात्र ते मिळाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, भरत भंगाळेसह चौघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर खंडपीठाने तपाधिकाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासाधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी खंडपीठात म्हणणे सादर करुन या चौघांचा अटकपूर्व जामीन नियमित करु नये तसेच मुख्य आरोपी फरार असून अपहाराचा आकडा मोठा असल्याचे न्यायालयात सांगितले.दरम्यान, या चौघांना खंडपीठाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व मंजूर केला होता. त्यानुसार संदीप पाटील यांनी मोहिनी भंगाळे व्यतिरिक्त तिघांची सोमवारी चौकशी केली. दरम्यान, या दोन दिवसात आणखी काही जणांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी