जळगाव : मनपाच्या अग्नीशमन विभागासाठी आलेला ३८ लाखांचा निधी मनपाच्या अधिकार्यांनी आधीच्या निधीचे विनियोगपत्र वारंवार सूचना देऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर न केल्याने हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.मनपा आर्थिक अडचणीत असल्याने विकास कामांसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मात्र अग्नीशमन विभाग बळकटीकरणासाठी यापूर्वी देखील शासनाकडून मनपाला निधी मिळाला होता. आता आणखी ३८ लाखांचा निधी मिळाला आहे. वारंवार सूचना देऊनही मनपाच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांनी आधीच्या निधीचे विनियोग प्रमाणपत्रच सादर केलेले नाही. त्यामुळे हा निधी अखेर परत जाण्याची स्थिती आहे. मनपा वार्यावरमनपा आयुक्त महिनाभरापासून सुटीवर असून जिल्हाधिकार्यांकडे प्रभारी पदभार आहे. त्यामुळे मनपाचे प्रशासन सध्या वार्यावर आहे. अधिकारी, कर्मचार्यांना धाक उरलेला नसल्यानेच लाखोंचा निधी परत जाण्याची वेळ आली आहे.
अग्नीशमनचा ३८ लाखांचा निधी जाणार परत
By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST