शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

चाळीसगावला ३५३ बालकांची त्वचारोग तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 19:55 IST

मोफत आरोग्य शिबिर : विकलागांसाठी साहित्य दालनही उभारणार

चाळीसगाव, जि.जळगाव : एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर आला असताना नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी त्यांच्या मुलीच्या स्मृती जपताना रंजल्या-गांजल्यांसाठी आरोग्याचा दीप प्रज्वलीत करून सुदृढ आदर्श निर्माण केल्याचा सूर येथे व्यक्त झाला.मंगळवारी बापजी रुग्णालयात राजेश्वरी जाधव हिच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित मोफत बाल त्वचारोग निदान शिबिर झाले. शिबिरात ३५३ बालकांची त्वचारोग तपासणी करून उपचारही करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात आहे. राजेश्वरीच्या स्मरणार्थ विकलागांसाठी साहित्य दालन उभारण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.अध्यक्षस्थानी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख होते. व्यासपीठावर माजी आमदार राजीव देशमुख, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, डी.वाय.एस.पी.नजीर शेख, पो.नि. रामेश्वर गाडे पाटील, सहायक धर्मदाय आयुक्त, सी.यू.तेलगावकर, डॉ.राहुल शिंदे, डॉ.अभिषेक पाटील, डॉ.धर्मराज राजपूत, डॉ.भूषण राजपूत, डॉ.प्रमोद औस्तवाल, डॉ.चेतन साळुंखे, डॉ. विद्या मोरे, डॉ.मनोज भोसले, शशिकांत साळुंखे, भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर , प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.नरेंद्र राजपूत, डॉ.सुनील राजपूत, डॉ.संदीप देशमुख, रामचंद्र जाधव, स्मिता बच्छाव, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मीनाक्षी निकम, किसनराव जोर्वेकर, धर्मभूषण बागुल, डॉ.उज्वला देवरे डॉ. हेमांगी पूर्णपात्रे, सायली जाधव, घृष्णेश्वर पाटील, आगारप्रमुख संदीप निकम, पद्मजा देशमुख, अनिता चौधरी, सुरेश चौधरी, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.प्रास्तविक रामचंद्र जाधव यांनी केले तर यशस्वीतेसाठी श्याम देशमुख, प्रमोद पाटील, भगवान पाटील, दीपक पाटील, मंगेश पाटील, डॉ.प्रमोद सोनवणे, जगदीश चौधरी, महेंद्र पाटील, रोशन जाधव, गौतम जाधव, संभा जाधव, स्वप्नील कोतकर, किरण जाधव, जितेंद्र जाधव, संदीप जाधव, संतोष पोळ, मयूर बागुल, राहुल जाधव, विकास जाधव, केशव निकम, समाधान अहिरे, प्रकाश मोरे, सुमित सोनवने, अरुण जाधव, किरण पगारे, संदीप चव्हाण, राहुल जाधव, प्रतीक पाटील, भूषण खलाणे, सौरभ त्रिभुवन, शिवसागर पाटील, यज्ञेश बाविस्कर, निखिल सोनजे, सूरज साळुंखे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ.संतोष मालपुरे यांनी, तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले.विकलांग दालनासाठी ५१ हजारांची देणगीराजेश्वरी जाधव विकलांग असूनही शिक्षणाबद्दल तिला विशेष आस्था होती. तिच्या स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी ‘विकलांग साहित्य सहायता दालन’ उभारण्याची घोषणा अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.सुनील राजपूत यांनी केली. त्यांच्या घोषणेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी रोख ५१ हजारांची देणगी संकलित झाली. याच साहित्य सहायता दालनातून गरजू विकलांगांना मदत केली जाईल, असेही या वेळी जाहीर करण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यChalisgaonचाळीसगाव