शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

बॅग लांबविणारी आंध्र प्रदेशातील 35 जणांची

By admin | Updated: September 21, 2015 00:54 IST

जिल्ह्याभरात सक्री टोळी य असल्याचे उघड :

 चौकडीकडून दोन तोळे सोने व 28 हजाराची रोकड जप्त; आरोपींचा शोध सुरु

जळगाव : जमिनीवर तुमचे पैसे पडले आहेत, असे सांगून शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भर बाजारातून कारमधील महिलेचे रोख रकमेसह तीन लाखाचे दागिने लांबविणा:या चौकडीकडून दोन तोळे सोने व 28 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीतील अन्य साथीदार फरार झाले आहेत. 30 ते 35 जणांची ही आंध्र प्रदेशातील ही टोळी जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे.

चोपडा येथील अनिता अनिल जैन (50) या दागिन्यांची दुरुस्ती व खरेदीसाठी कारने (क्र.एम.एच.19 बी.जे.0707) जळगावात आल्या होत्या. काम आटोपून सुभाष चौकात आईस्क्रीमच्या दुकानाजवळ त्या कारमध्ये बसल्या असताना चौघांपैकी दोघांनी कारच्या बाजूूला दहाच्या काही नोटा जमिनीवर टाकून त्यांनी मॅडम तुमचे पैसे खाली पडले असे सांगितले. मागे वळून पाहिले असता ते पैसे आपले नसल्याने चालक हिंमत पुंडलिक पाटील रा.भोई वाडा यांना तुमचे पैसे आहेत का? असे विचारले असता तितक्यात अन्य दोघांनी मागील सीटवरील हँड बॅग लांबविली.

बॅग लांबविल्याचे समजताच अनिता जैन यांनी मुलाला बॅगेबाबत विचारणा केली. नकार दिल्याने त्याला तेथील पोलीस चौकीत नेण्यात आले. दरम्यान, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पौजदार बडगुजर, सिध्दार्थ बैसाणे, नरेंद्र ठाकरे, शेखर पाटील, गजानन बडगुजर, अनिल धांडे, मिलिंद बळवंतकंक, योगेश वाघ, जितेंद्र सोनवणे, सपकाळे व होमगार्ड विलास देसले यांना पाठलाग करायला सांगितले. अजिंठा चौकात एक जण पानटपरीवर तर दुसरा प्रवाशी वाहतूक करणा:या गाडीजवळ उभा असताना झडप घालून त्यांना पकडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फरार आरोपींना शोधण्यासाठी मोबाईल लोकेशननुसार एलसीबीचे दिनेशसिंग पाटील,विजय पाटील, दिनेश बडगुजर, गोपाळ चौधरी व नरेंद्र वारुळे यांनी त्यांचा शिवाजी नगरात शोध घेतला,मात्रते सापडले नाहीत.

लॅपटॉप चोरीच्या घटनांमध्ये संशय

शहरात कारमधून लॅपटॉप व बॅगा लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात याच टोळीतील सदस्यांचा सहभाग असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या टोळीत महिलाही समावेश आहे.