शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

रविवारी ३४२० विद्यार्थी देणार एम-सेट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:20 IST

आठ केंद्र : प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाद्वारे जळगाव केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या ३६व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चाचणी (एम-सेट) परीक्षा रविवारी जळगाव शहरातील आठ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.एम-सेट परीक्षेसाठी तीन हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यावर दिलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सेट परीक्षेचा अर्ज भरताना वापरलेला लॉगिन आयडी व पासवर्डचा उपयोग करावयाचा आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करताना काही अडचणी आल्यास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.असे आहेत परीक्षा केंद्रमुळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरातील केंद्र संकेतांक क्रमांक १४०१- स्वामी विवेकांनद भवन-अ, केंद्र संकेतांक क्र.१४०२- स्वामी विवेकांनद भवन-ब, केंद्र संकेतांक क्रमांक १४०३-केसीईचे शिक्षणशास्र महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०४- केसीइचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, केंद्र संकेतांक क्रमांक १४०५ - केसीईचे अभियांत्रिकी महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०६- अ‍ॅड. सीताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०७ पी.एन. लुंकड कन्या शाळा व केंद्र संकेतांक क्रमांक १४०८ ओरियन सीबीएसई स्कूल अशा एकूण आठ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव