जळगाव - महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी मतदारांना उमेदवारांनी पैसे वाटपाच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या. दरम्यान, दुपारी ३.३० वाजेनंतर शहरातील अनेक केंद्रावंर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.बुधवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दुपारी १.३० वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली. दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले होते. मनपा प्रशासनाने केलेल्या मतदान जागृती अभियानानुसार यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती. मात्र, दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी पाहता गेल्या निवडणुकीइतकीच मतदानाची सरासरी राहण्याची शक्यता आहे.
जळगाव मनपा निवडणुकीसाठी ३४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:43 IST
जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले.
जळगाव मनपा निवडणुकीसाठी ३४ टक्के मतदान
ठळक मुद्देदुपारी तीन वाजेनंतर मतदारांच्या केंद्राकडे धावसुरुवातीला मतदारांचा निरूत्साहगेल्या निवडणुकीइतकीच मतदानाची सरासरी राहण्याची शक्यता