शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीचा ३० लाखांसाठी छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 18:12 IST

घर घेण्यासाठी माहेरुन ३० लाख रुपये आणावे यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत हिचा पती व सासरच्या लोकांना छळ केला व पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या नगरात घडला आहे.

ठळक मुद्देपतीसह सात जणांविरुध्द गुन्हामहिला सहाय्य कक्षाच्या शिफारशीनुसार गुन्हा दाखलअंगावरील दागिने काढून घरातून हाकलून लावले

जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन ३० लाख रुपये आणावे यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत हिचा पती व सासरच्या लोकांना छळ केला व पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या नगरात घडला आहे. याप्रकरणी महिला सहाय्य कक्षाच्या शिफारशीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सोनाली यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १२ डिसेंबर २०१३ रोजी रितीरिवाजाप्रमाणे सोनाली यांचा किशोर गोविंदा राजपूत (रा.बालाजी पेठ, जळगाव) याच्याशी विवाह झाला. लग्नात आंधन म्हणून दोन लाखाचे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य दिले होते. लग्नानंतर चार महिने दोघांचा संसार सुरळीत चालला. त्यानंतर सासरच्या लोकांकडून त्रास सुरु झाल्याने पती-पत्नी सोनाली यांच्या वडीलांच्या मालकीच्या अयोध्या नगरातील घरात वास्तव्याला गेले. तेथे काही दिवस संसार सुरळीत चालल्यानंतर शेजारी राहणाºया नणंद सरला राजपूत व नंदोई कोमल राजपूत यांच्याकडून सतत टोचून बोलले जात होते. तेथेही त्रास झाला. याप्रकरणी पती किशोर गोविंदा पाटील, सासू सुनंदाबाई, सासरे गोविंदा रतन राजपूत, दीर विनोद (सर्व रा.बालाजी पेठ,जळगाव), कोमल राजपूत (नंदोई), सरला कोमल राजपूत (नणंद) व लक्ष्मण किसन राजपूत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :crimeगुन्हेJalgaonजळगाव