आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि.२ : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा) श्री समर्थकांनी सोमवारी शहराच्या काही भागात स्वच्छता अभियान राबविले. ११५२ श्री समर्थक सदस्यांनी शहरातील ३० कि.मी.चे रस्ते स्वच्छ केले.सकाळी साडेसात वाजता सिग्नल चौकातून स्वच्छतेला प्रारंभ झाला. साडेअकरा वाजता सांगता झाली. आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पालिका गटनेते राजेंद्र चौधरी, तहसीलदार कैलास देवरे, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, पालिकेचे आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, विश्वास चव्हाण, पं.स.चे उपसभापती संजय पाटील, डॉ. विनोद कोतकर, नगरसेवक नितीन पाटील, रवींद्र चौधरी, बापू अहिरे, प्रतिभा पवार आदी लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही स्च्छता अभियानात सहभागी झाले होते.शहरातील ११५२ सदस्यांनी ७२ टन १२५ किलो कचरा गोळा करून पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये संकलित केला. यासाठी खासगी व पालिकेच्या अशा एकूण ५६ वाहनांचा ताफा होता. यात ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यासोबतच इतरही वाहने होती. दुपारपर्यंत चालेल्या स्वच्छता मोहिमेत शहरातील २९.५० किलोमीटर रस्ते चकाचक करण्यात आले. अभियानासाठी प्रतिष्ठानचे श्री सदस्य तसेच पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय कन्याशाळेचे काही शिक्षक आदी उपस्थित होते.
चाळीसगावमध्ये श्रीसमर्थ साधकांनी केले ३० कि.मी. रस्ते स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:46 IST
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.२ : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा) श्री समर्थकांनी सोमवारी शहराच्या काही भागात स्वच्छता अभियान राबविले. ११५२ श्री समर्थक सदस्यांनी शहरातील ३० कि.मी.चे रस्ते स्वच्छ केले.
चाळीसगावमध्ये श्रीसमर्थ साधकांनी केले ३० कि.मी. रस्ते स्वच्छ
ठळक मुद्दे११५२ सदस्यांनी केला ७२ टन १२५ किलो कचरा संकलितचाळीसगाव शहरातील २९.५० किलोमीटर रस्ते झाले चकाचकचाळीसगाव सोबतच जळगाव जिल्ह्यात अन्य ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले.