शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ३ वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:25 IST

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

अमळनेर : चोपडा तालुक्यातील वडती येथे अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणा-या जुबेद पिंजारी यास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा ठोठावली असून चार वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा व दंड ठोठावला.९ आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जुबेद राजू पिंजारी हा आपल्या चुलत बहिणी सोबत नवरात्र उत्सव पाहून घराकडे पायी परतत असताना गावातील मारुती मंदिरा जवळ चौकापुढे अंधारामध्ये फिर्यादी सोळा वर्षीय तरुणीचा हात पकडून विनयभंग केला. त्यावेळी पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याने पीडित तरुणीचा भाऊ दीपक कोळी हा त्या ठिकाणी आला होता. जुबेद पिंजारी याने दारूची बाटली दीपकच्या डोक्यात मारल्याने दीपक जखमी झाला होता.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. किशोर आर. बागूल यांनी काम पाहिले. त्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.अति जिल्हा व सत्र न्या. राजीव पी. पांडे यांनी यावेळी जुबेद यास बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ८ प्रमाणे ३ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड व कलम १२ प्रमाणे १ वर्ष शिक्षा व एक हजार रु. दंड, भांदवी कलम ३२४ अन्वये दीपक यास जखमी केल्या प्रकरणी १ वर्ष शिक्षा व २ हजार रुपये दंड तर ३२३ प्रमाणे पीडित तरुणीशी हुज्जत घातल्याप्रकरणी ६ महिने अशी शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव