शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

29 पाणी पुरवठा समित्यांवर करणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 21:46 IST

अपहार: कार्यवाहीसाठी 20 डिसेंबर डेडलाईन

ठळक मुद्दे 31 गावांना काही दिवसांची मुदत 4 गावांची कामे पूर्ण
जळगाव- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत भारत निर्माण योजनेत जिल्ह्यातील 29 पाणी पुरवठा योजना समित्यांवर अपहार व अनियमीतता प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 14 रोजी दिले. ग्रामीण पाणी पुरवठा योजना आढावा बैठक जि. प. च्या सानेगुरुजी सभागृहात झाली. या बैठकीत संबंधित पाणी पुरवठा योजना समिती अध्यक्ष, सचिव तसेच तांत्रिक सल्लागार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिवेगावकर यांनी दिले. ही कार्यवाही 20 डिसेंबर्पयत करण्याची ताकीद दिली असून शाखा अभियंता, उपअभियंता व गटविकास अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बैठकीस पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता एस. बी. नरवाडे, अभियंता व चोपडा, जळगाव, भुसावळ, धरणगाव येथील गटविकास अधिकारी उपस्थित होते.यापूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा आढावा 22 ऑक्टोबर रोजी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला होता. त्यावेळी मुल्यांकण न करणे, प्रत्यक्षात काम न करता पैसे काढणे, समितीने दप्तर सादर न करणे आदी कारणांमुळे एकूण 40 समित्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. सात दिवसाची कार्यवाही करण्याची मुदत दिली होती. परंतु काही दिवस संधी देत 14 डिसेंबर रोजीच्या बैठकीत फेरआढावा घेण्यात आला. त्यावेळी 29 ठिकाणी अपहार व अनियमीतता आदी बाबी कायम असल्याचे दिसून आल्याने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर इतर कामे अपूर्ण असलेल्या 31 गावांना काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 15 दिवस ते 3 महिने अशी ही मुदत असून 4 गावांची कामे पूर्ण झाली आहेत... या गावांच्या योजनांवर होणार गुन्हे दाखलमुक्ताईनगर तालुका- खर्ची, डोलारखेडा, चिंचोल, उमरे. बोदवड तालुका- बोदवड, सुरवाडे खुर्द. रावेर तालुका- निमडय़ा, गारबर्डी, गारखेडा, अंधारमळी. अमळेनर तालुका- रुंधाटी, कंडारी खुर्द, लोणे. पारोळा तालुका- मेहू. चोपडा तालुका- मालखेडा, जळगाव तालुका- म्हसावद. धरणागाव- साळवा, रेल, सतखेडा, नांदेड, खर्दे, बाभुळगाव, हिंगोणे खुर्द, कंडारी, दोनगाव, एकलग्न, चोरगाव. भुसावळ तालुका- आचेगाव.. या गावांना दिली मुदतबोदवड तालुका- मनुर बुद्रुक, राजूर, करंजी, सुरवाडे बुद्रुक, पाचदेवळी. रावेर तालुका- बक्षीपूर, निंभोरासीम, उदळी खुर्द, पाल. पाचोरा तालुका- खडकदेवळा, चुंचाळे, खाजोळा, सारोळा खुर्द. चाळीसगाव तालुका- उमरखेड, लोंढे, खराडी. अमळनेर तालुका- हेडावे, बिलखेडा, हिंगोणे, खुर्द प्र अमळनेर, तळवाडे. पारोळा तालुका- टेहू, जिराडी. जळगाव तालुका- वसंतवाडी, जामनेर तालुका- पिंपळगाव कमानी, धरणगाव तालुका- निशाने बुद्रुक, निशाने खुर्द, शामखेडा, गारखेडा, झांबोरे खुर्द, हिंगोणे खुर्द.चार गावांमध्ये योजना पूर्णरावेर तालुका- वाघाडी. चोपडा तालुका- धानोरा. धरणगाव तालुका- उखळवाडी. एरंडोल तालुका- टाकरखेडा.