शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धक्कादायक! विवस्त्र करुन विद्यार्थ्यांचं रॅगिंग; एका विद्यार्थ्याच्या धाडसानं फोडली घटनेला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 19:44 IST

इकरा युनानी महाविद्यालयातील प्रकार

जळगाव : इकरा युनानी महाविद्यालयात शनिवारी मध्यरात्री सिनियर विद्यार्थ्यांकडून २८ विद्यार्थ्यांची रॅगिंग झाली असून यातील काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुदस्सर मुख्तार इनामदार (वय १९, रा.परभणी) या विद्यार्थ्याने या प्रकरणाला वाचा फोडली. दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे या घटनेची तक्रार झाल्यानंतर तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदस्सर हा परभणी येथील राहणारा असून त्याचे वडील होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत आहेत. मुदस्सर याला शासकीय कोट्यातून शहरातील पाचोरा रस्त्यावरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. प्रवेश घेतल्यानंतर शुक्रवारी मुदस्सर याला पालकांनी वसतीगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्यांच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी मध्यरात्री दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.सिनेमातील पात्र करायला लावलेमुदस्सरने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता रॅगिंग करणाऱ्यांनी काही विद्यार्थ्यांना विवस्त्र केले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्या प्रमाणे अ‍ॅक्टिंग करण्यास सांगून नंतर एकेका विद्यार्थ्यांची ओळखपरेड घेतली. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळदेखील केली. त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला खाली वाकवून मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच, खिशातील १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले. ट्युबलाईट न विझवल्यास ती अंगावर फोडू असे धमकावण्यात आले. या विद्यार्थ्यांचा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सर याने स्वत:ची सुटका करुन घेत थेट हॉलमधून पळ काढला.सुरक्षा रक्षकाच्या मदतीने साधला वडिलांशी संपर्करॅगिंग करणाऱ्यांपासून सुटका केल्यानंतर मुदस्सर याने सुरक्षारक्षकाच्या मदतीने पालकांना फोन करुन माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. दरम्यान, मुदस्सर याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबवला असून त्याची तक्रार त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.राष्ट्रीय अ‍ँटी रॅगिंग समितीकडे तक्रारमुदस्सर याने पहाटे पावणे चारच्या सुमारास दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे मेलद्वारे तक्रार केली. आज सकाळी नऊच्या सुमारास त्यांना तक्रारीची नोंदणी झाल्याचा मेल आला. यादरम्यान प्राचार्यासह पालकांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणेही गाठले होते. राष्ट्रीय अँन्टी रॅगिंग समितीच्या सुचनेनुसार प्राचार्य डॉ. शेख यांनी विद्यालयाच्या कार्यालयात रात्री सर्व २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले.