शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पाच टन खाद्य तेलासह २८ किलो लाडू, २४ किलो पेढा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:56 IST

अस्वच्छ स्थितीत तयार केले जात होते पदार्थ

ठळक मुद्देसणासुदीत ‘एफडीए’ची कारवाईसणासुदीत खाद्य पदार्थाबाबत संशय

जळगाव : अस्वच्छ व घाणेरड्या स्थितीत अन्नपदार्थ तयार करीत असल्याने जळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने तपासणी करून तब्बल २८ किलो बेसणाचे लाडू, २४ किलो पेढा आणि ५ टन खाद्यतेल जप्त केले. ऐन सणासुदीत ही कारवाई झाल्याने खाद्य पदार्थ उत्पादनाच्या शुद्धतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.औद्योगिक वसाहत परिसरातील ई-१४ मधील मे. एम.व्ही. फूडस् या कंपनीमध्ये अन्न निरीक्षक विवेक पाटील, अनिल गुजर यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ व घाणेरड्या स्थितीमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासह त्यांची साठवणूक केली जात होती. त्याची पाहणी करून त्यांचे नमुने घेऊन ५ हजार ६०० रुपये किंमतीचे २८ किलो बेसणाचे लाडू व ८ हजार ६४० रुपये किंमतीचा २४ किलो पेढा जप्त करीत तो नष्ट केला.या सोबतच औद्योगिक वसाहतीमधीलच मे. विनायक ट्रेडिंग कंपनी येथेदेखील तपासणी केली असता तेथे सोयाबीनच्या खाद्य तेलाचे नमुने घेतले व संशयावरून तब्बल ४ लाख ६ हजार रुपये किंमतीचे ५ टन खाद्यतेल जप्त केले.या सर्व वस्तूंचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, अनिल सोनार यांनी ही कारवाई केली.सणासुदीत खाद्य पदार्थाबाबत संशयदिवाळी सणाच्या काळामध्ये विविध प्रकारच्या मिठाईसह फरसाणला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यात हे पदार्थ तयार करताना अशुद्ध घटक पदार्थांचा वापर होण्यासह शुद्धतेबाबत दिवसेंदिवस संशय बळावत असून या कारवाईने त्यास एक प्रकारे दुजोराच मिळत आहे. त्यामुळे खाद्य पदार्थ खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :FDAएफडीएJalgaonजळगाव