शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २७ शाळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:44 IST

जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘लेक वाचवा लेक शिकवा अभियान’ अंतर्गत हरी महारू खलाणे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील २७ शाळांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्दे‘लेक वाचवा लेक शिकवा अभियान’लहान गटात ए.बी. हायस्कूलची विद्यार्थिनी मयुरी अगोने प्रथममोठ्या गटात जयहिंद विद्यालयाची विद्यार्थिनी वर्षा पवार प्रथम

चाळीसगाव : जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘लेक वाचवा लेक शिकवा अभियान’ अंतर्गत हरी महारू खलाणे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील २७ शाळांनी सहभाग घेतला.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक खलाणे होते. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटराव भोळे यांनी उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, नगरसेविका शोभाबाई पवार, संस्थेच्या अध्यक्षा लताबाई खलाणे, उपाध्यक्ष जगन्नाथ खलाणे, वाघडूचे मुख्याध्यापक भालेराव, प्राचार्य अभिजित खलाणे उपस्थित होते. परीक्षक म्हणून पृथ्वीराज चव्हाण, एस.डी.संन्याशी यांनी काम पाहिले.प्रास्ताविक सोनाली महाजन यांनी केले. अशोक खलाणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थी हा वक्तृत्वातून आत्मविश्वास निर्माण करतो. तसेच नेत्तृत्व गुणही विकसित करतो, असे सांगितले.२७ शाळांनी घेतला सहभागया कार्यक्रमातून एकूण २७ शाळांनी सहभाग नोंदविला. लहान गटात प्रथम क्रमांक ए.बी. हायस्कूलची विद्यार्थिनी मयुरी संदीप अगोने हिने, तर द्वितीय क्रमांक सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जानवी मनोहर रॉय, तृतीय क्रमांक सामंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी इंद्रायणी उदयराव भोसले तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांक जयहिंद माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वर्षा सुदाम पवार, द्वितीय क्रमांक ए.बी.मुलांची हायस्कूल विद्यालयाचा विद्यार्थी मंथन कांतीलाल कुमावत, तृतीय क्रमांक पूर्णपात्रे विद्यालयाचा विद्यार्थी यश रुपेश पगार याने पारितोषिक मिळविले.सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले, तर आभार एस.एस.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागप्रमुख सुजितकुमार सोनावणे व शिक्षकांनी सहकार्य केले.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव