शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात अद्यापही 250 कि.मी. रस्त्यावर खड्डे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:16 IST

‘खड्डेमुक्ती’चा शुक्रवार शेवटचा दिवस

ठळक मुद्दे पावसामुळे उघडे पडलेल्या खडय़ांचेही काम बाकीखड्डेमुक्तीची घोषणा हवेतच विरली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14- खड्डेमुक्त रस्ते करण्याची मुदत 15 डिसेंबर रोजी संपत असली तरी अद्यापही जिल्ह्यातील जवळपास 250 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाकी आहे. 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा अधिकारी करीत आहे. मात्र त्यातही खड्डे बुजविल्यानंतर पाऊस झाल्याने अनेक खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे त्यांचेही काम होणे बाकी आहे. राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे पडून त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्त रस्ते करण्यात येण्याची घोषणा केली होती. खड्डेमुक्तीच्या घोषणेमध्ये 15 डिसेंबरची मुदत उद्या संपत असल्याने या संदर्भात आढावा घेतला असता अद्यापही 250 कि.मी. रस्त्यांवरील काम बाकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्ग मिळून एकूण साडेचार हजार कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 2000 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे याअंतर्गत बुजविण्यात येणार आहे. या 2000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 1750 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येऊन साधारण 90 टक्के काम झाले आहे. मात्र आता एकच दिवस शिल्लक असल्याने एका दिवसात 250 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे कसे शक्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

बुजविलेल्या खडय़ांवर ‘पाणी’2000 कि.मी. पैकी 1750 कि.मी लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले असले तरी त्यानंतर झालेल्या पावसाने खड्डे पुन्हा उघडे पडले आहे. या खडय़ांचेही अद्याप काम बाकी आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्तीची घोषणा हवेतच विरली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. 

खड्डेमुक्तीच्या कामांतर्गत 90 टक्के काम झालेले असून उर्वरित काम 15 ते 20 डिसेंबर्पयत पूर्ण होईल. - प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.