शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील उडीद,मूग उत्पादकांना मिळणार विम्याची २५ टक्के रक्कम

By ajay.patil | Updated: September 10, 2023 18:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना : कापूसाठीही काढली जाणार अधिसूचना ; गिरीश महाजनांची माहिती

जळगाव - जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात २७ महसूल मंडळांमध्ये २१ किंवा त्यापेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड राहिल्यामुळे उडीद व मूग या पीकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २७ महसूल मंडळातील उडीद व मूग उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाईची २५ टक्के रक्कम लवकरच मिळणार आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर आलेल्या अहवालानुसार ही २५ टक्के रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्याबाबतची अधिसूचना शुक्रवारी काढली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची ६ हजार रुपयांची २५ टक्के रक्कम लवकरच प्राप्त होणार आहे. यामुळे पावसाअभावी उत्पादनात नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे.

इतर पीकांसाठीही १० दिवसात निघणार अधिसूचना - गिरीश महाजनसर्वसमावेशक पीक विमा योजनेतील निकषानुसार हंगामातील प्रतिकुल परिस्थितीच्या २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाईची अधिसूचना काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार उडीद, मूग या पीकांच्या नुकसानीची माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसेच कापूस, सोयाबीन व इतर खरीप पीकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून, याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या असून, येत्या दहा दिवसात इतर पीकांसाठीही जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी