जि. प. सदस्या पल्लवी सावकारे या गेल्या दोन वर्षांपासून गौण खनिज प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराबाबत पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे कंत्राटदारांनी जिल्हा परिषदला गौण खनिजांची रॉयल्टी न भरता कामे केल्याचे निदर्शनास आले होते. तसेच रॉयल्टी पावत्या या बनावट सादर करून शासन व जिल्हा परिषदची फसवणूक केल्याचे समोर आले होते. या सर्व प्रकरणात दोषींवर कारवाई होण्यासाठी पल्लवी सावकारे यांनी गेल्या महिन्यात नवनियुक्त सीईओ पंकज आशिया यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. आशिया यांनीदेखील या प्रकरणात स्वत: लक्ष देऊन डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे यांना या गैरव्यहारप्रकरणी सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रणदिवे यांनी पल्लवी सावकारे यांच्याकडील पुरावे घेऊन सुधारित अहवाल तयार केला असून, या गैरव्यवहारात अनेकांवर ठपका ठेवला आहे.
इन्फो :
२४ लाखांचा गैरव्यवहार व नऊ अधिकाऱ्यांवर ठपका
या प्रकरणात तयार करण्यात आलेल्या अहवालात खडी, मुरूम व वाळूमध्ये बोगस पावत्या तयार करून मक्तेदाराला रॉयल्टी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या नावेही खोटी पत्रे दाखवून, रॉयल्टी दिल्याचे नमूद करण्यात आले असून, अधिकाऱ्यांनी संगनमताने स्वत:चा आणि मक्तेदाराचा फायदा केल्याचे नमूद केले आहे. यामध्ये एकूण २४ लाख १३ हजार ५३० रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. तसेच २०१५ ते २०१९ या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारातील ४ कनिष्ठ अभियंते व ५ उपअभियंते असे एकूण नऊ अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले आहे.
इन्फो :
सिंचन विभागाकडून गौण खनिज प्रकरणाचा अहवाल तयार झाला आहे. दोन दिवसांत सीईओंना सादर करण्यात येईल.
- कमलाकर रणदिवे, डेप्युटी सीईओ, जिल्हा परिषद, जळगाव