शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

जिल्ह्यातील २३३९ शाळांची होणार धुरातून मुक्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अमलात आणली. या योजनेतून जळगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अमलात आणली. या योजनेतून जळगाव जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या अशा एकूण २७५६ शाळांमधून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो; परंतु शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी लाकडांचाच वापर करावा लागतो. त्यामुळे शाळेच्या आवारात शालेय पोषण आहार शिजविताना चुलीतून धूर निघत होता. या धुरावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने आता झालेय पोषण आहार चुलीवर शिजविणाऱ्या शाळांना गॅस कनेक्शन देण्याचे ठरविले आहे. यामध्‍ये जळगाव जिल्ह्यातील २३३९ शाळांना गॅस कनेक्शन दिले जात असल्याने या शाळा धूरमुक्त होणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील २७५६ शाळांतून शालेय पोषण आहार दिला जातो. त्यापैकी ३४६ शाळांमध्‍ये आधीच गॅस कनेक्शन आहे, तर २३३९ शाळांमध्‍ये गॅस कनेक्शन नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये चुलीवरच पोषण आहार शिजविला जात होता; परंतु आता गॅसवर हा पोषण आहार शिजविला जाणार आहे. ज्या शाळांकडे गॅस कनेक्शन नाही, अशा शाळांची यादी शिक्षण विभागाकडून शासनाकडे पाठविण्‍यात आली आहे. लवकरच शाळांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. परिणामी, स्वयंपाकी महिलांना चूल फुकण्याचा त्रास कमी होणार आहे.

- कोट

जळगाव तालुक्यातील २०९ शाळांमध्‍ये गॅस कनेक्शन नाही. अशा शाळांची यादी जिल्हास्तरावर पाठविण्‍यात आली आहे. लवकरच गॅस कनेक्शन शासनाकडून मिळणार आहे. यामुळे शाळा धूरमुक्त होणार आहेत.

- सतीष चौधरी, गटशिक्षणाधिकारी, जळगाव

==================

शापोआ लाथार्थी एकूण शाळा

- २७५६

==================

गॅस नसलेल्या शाळा

- २३३९

==================

- गॅस कनेक्शन नसलेल्या तालुकानिहाय शाळांची संख्या

भुसावळ : ९६

रावेर : १४२

अमळनेर : १७७

एरंडोल : १०३

धरणगाव : १२६

चोपडा : २००

जामनेर : २०२

भडगाव : १३१

चाळीसगाव : २४४

जळगाव : २०९

मुक्ताईनगर : १३०

पारोळा : १२१

पाचोरा : २०९

बोदवड : ६५

यावल : १८४