शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:50 IST

शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले

ठळक मुद्दे१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला पाठविलेपावसामुळे साथीच्या आजारांची भितीडेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती

जळगाव : शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १० रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिली आहे.भाईटेनगरातील एक सहा वर्षीय बालक, आदर्शनगरातील तरुणासह तब्बल २१ जणांना डेंग्यू सदृश आजार झाला आहे. या सोबतच रक्त तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याचे सांगण्यात येत असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढजून महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला. तसेच जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढल्या.यात अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. भोईटेनगरातील सहा वर्षीय बालकास त्याची लागण झाली होती. तसेच गेल्या आठवड्याभरात जोरदार पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मनपा आरोग्य विभागाच्या तपासणीत २१ रुग्णांना डेंग्यू सदृश आजार झाल्याचे आढळून आले आहे. पावसामुळे अनेक ठिंकाणी पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.मनपाकडून फवारणी सुरुमनपा प्रशासनाकडून ज्या भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागांमध्ये धुरळणी व फवारणी सुरु केली आहे. गणपतीनगर, जयनगर यासारख्या उच्चभ्रू रहिवासी भागांसह भोईटेनगरमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने तेथे धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटिंगचे काम केले जात असल्याची माहिती मनपा मलेरिया निर्मूलन विभागाकडून देण्यात आली आहे.प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन नाहीसाथीच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचा तक्रारी मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेवून, शहरात प्रभागनिहाय धुरळणी व फवारणी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप देखील मनपा आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराच्या जवळपास कुठेही पाणी साचू देऊ नये, तसेच सेप्टिक टँकच्या गॅस पाईपला जाळी बसवून घ्यावी, असे आवाहन मलेरिया निर्मूलन विभागाने केले आहे.१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला रवानाशहरात आढळलेल्या २१ संशयित रुग्णांपैकी १० रुग्णांच्या रक्तांचे नमुने औरंगाबादला पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे शहरात ८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने खबरदारी घेवून तत्काळ रुग्णांचे नमुने औरंगाबादा पाठविले आहेत. दोन दिवसात या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका