शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादच्या बारागाड्यांना द्विशतकी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 15:55 IST

खंडेराव महाराज यात्रोत्सवात आजपासून विविध कार्यक्रम.

ठळक मुद्देभगत सुदाम दामू धोबी यांच्याहस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमधोबी घराण्याकडे सहा पिढ्यांपासून मानदामू धोबी यांनी ओढल्या सलग ३५ वर्षे बारागाड्या

प्रसाद धर्माधिकारी । आॅनलाईन लोकमतनशिराबाद, ता.जळगाव, दि. ३१ : गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास ३१ मार्च शनिवारपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात बारागाड्या ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रविवारी सायंकाळी ५ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल.सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा ३१ मार्च रोजी शनिवारी सकाळी ८ वाजता श्रींची महापूजा पंचामृत अभिषेक पूजन होईल. सायंकाळी ६ वाजता सत्यनारायण पूजन होईल. यात्रोत्सवास आरंभ होईल.१ एप्रिल रविवारी सकाळी ८ वाजता श्रींची महापूजा अभिषेक होईल. सायंकाळी ५ वाजता भगत सुदाम दामू धोबी यांच्याहस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता कठडे मिरवणूक निघेल. त्यानंतर रात्री ८ वाजता चंदाबाई रावेरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. २ व ३ एप्रिल रोजी सकाळी श्रींचे पूजन अभिषेक व रात्री ८ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम होईल.चैत्र वद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. नशिराबाद येथील धोबी घराण्याकडे सहा पिढ्यांपासून म्हणजेच दोनशे वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. पिढ्यान्पिढ्या बारागाड्या ओढण्याची परंपरा धोबी घराण्याने सांभाळलेली आहे. दामू शंकर धोबी यांनी वयाची ८३ वर्षे ओलांडली तरी त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ते एकेकाळी नामांकित पहेलवान होते. त्यांनी सलग ३५ वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्याआधीही कित्येक पिढ्यांपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी मोतीलाल संपत धोबी (गोमा धोबी) यांचे निधन झाले. त्यामुळे आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर उर्फ सुदाम धोबी (भगत) यांनी ही धुरा सांभाळली आहे. यंदा बारागाड्या ओढण्याच त्यांचे तिसरे वर्ष आहे. येथील बारागाड्या व खंडेराव महाराज यात्रोत्सवास अनन्य महत्व आहे. आतापर्यंत कै.रघु धोबी, कै.शंकर रघू धोबी, कै.गणपत शंकर धोबी, कै.मोतीलाल संपत धोबी यांनी बारागाड्या ओढल्या. अशी माहिती सुदाम धोबी यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव