येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) यांच्यामार्फत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्या प्रज्ञा शोध (एनएमएमएस परीक्षेत २० गुणवत्ता यादीत निवडले गेले असून निवड झालेला प्रत्येक विद्यार्थी ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये ओम महेंद्र पाटील, भूमी शैलेंद्र पाटील, राधिका अनिल पाटील, सुमित विजय चौधरी, मृणाल जिजाबराव पाटील, दुर्गेश रवींद्र पाटील, दर्शन भगवान पाटील, साई संदीप गुजर, विरेन प्रदीप चौधरी, मिहीर अनिल पाटील, ययाती पंडित पाटील, कुणाल संदीप बोरसे, गौरी मनोहर पाटील, मनस्वी भीमराव पाटील, भाविका रमेश पाटील, दिव्या रामकृष्ण पाटील, ऋचा प्रदीप पाटील, स्नेहा कैलास पाटील, दुर्गेश कैलास पाटील, तोषराज प्रवीण कोळी या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांना व्ही. ए. निकम, बी. एम. तायडे, व्ही. बी. पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, गोकूळ भास्कर भोळे, भागवत भारंबे, अशोक कोल्हे, मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. किशोर पाठक, प्राचार्य मिलिंद पाटील, मुख्याध्यापिका नीता पाटील, विभाग प्रमुख रेखा पाटील यांनी अभिनंदन केले.