शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षीय महिलेने जिद्दीने केली व्याधीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 20:31 IST

प्राणायमही करतात नियमीतपणे

भुसावळ : म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल व जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे, असाच काहीचा प्रत्यय भुसावळ येथील प्रा. सरोज शुक्ला यांचा आला आहे. वय वर्ष ५५ असताना त्या लागोपाठ १०८ सूर्यनमस्कार काढतात व दररोज दहा किलोमीटर रनिंग करतात. यापूर्वी त्यांना दुखण्यामुळे सहज चालणे देखील त्रासदायक होते मात्र आता त्या सहज धाऊ लागल्या आहे.मूळच्या मुंबईच्या असलेल्या व लग्नानंतर भुसावळ येथे स्थायिक झालेल्या प्रा. सरोज शुक्ला या अध्यापनासह कौटुंबिक जबाबदारी सांभाळतात. काही वर्षे आनंदात गेली. परंतु २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात अचानक पायांच्या स्नायूंचे दुखणे बळावले. काही दिवस दुर्लक्ष केले परंतु पुढे गुडघेदुखी तीव्र झाली. त्यामुळे पायऱ्या चढणे व चालणे देखील त्रासदायक होत गेले. अशा परिस्थितीत महाविद्यालयातील वरच्या मजल्यावरील मिटींगला उपस्थिती आदी कामांवर परिणाम होत गेला.अशात स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचारही आला व त्या दृष्टिकोनातून कागदपत्रांची जुळवाजुळव केली परंतु या परिस्थितीत मात करण्यासाठी योगाभ्यास करायचा विचारही आला....आणि व्याधी पळालीव्याधीवर मात करण्यासाठी योग मार्गदर्शक ज्योती सोनवणे व गोपाळ सोनवणे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. इच्छा होती की सूर्यनमस्कार व इतर योगासने सहजपणे करावीत. परंतु सुरुवातीला अवघड जात होते. नियमितपणे जिद्दीने सूर्यनमस्कार सुरू ठेवले व बघता बघता शंभरावर सूर्यनमस्कार काढू लागल्यात. त्यावेळेस इच्छेनुसार त्यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात गंगा नदीच्या तीरावर सलग १०८ सूर्यनमस्कार काढले .हळूहळू धावणे वाढतच गेलेत्यानंतर पुढील ध्येय डोळ्यासमोर ठेवले ते म्हणजे धावण्याचे व फिटनेस कायम राखण्याचे. त्यासाठी शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार पाटील यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या सल्ल्यानुसार भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनच्या नियमित सरावांना उपस्थित राहतांना लक्षात आले ते म्हणजे एक किलो मीटर धावणे देखील अवघड आहे .परंतु पती प्रमोद शुक्ला यांचे प्रोत्साहन व प्रा. प्रवीण फालक यांचे मार्गदर्शन यामुळे हळूहळू धावायला सुरुवात केली व बघता बघता दहा कि.मी.सहज धावायला लागल्या.प्राणायमही करतात नियमीतपणे : आता सध्या लॉकडाऊनमुळे धावणे बंद असले तरी घरी राहून पुन्हा योगाभ्यास व सूर्यनमस्कार यांचा सराव सुरू केला आहे. दररोज एका श्वास मध्ये ५६ मिनीटात १०८ सूर्यनमस्कार त्या घालतात. तसेच कपालभारती ,प्राणायाम नियमित करीत आहेत. व्यायामापासून दूर असलेल्या सर्वांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.