अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील माध्यमिक विद्यालयाजवळ ४ रोजी रात्री व ५ रोजी सकाळी दोन वाहने दुभाजक न दिसल्याने दुभाजकावर आदळून अपघात झाला. एका घटनेत बापाने मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धुळे - चोपडा राज्य मार्ग १५ वर असलेल्या मंगरूळ गावाजवळ अंबर राजाराम पाटील माध्यमिक शाळेजवळ दुभाजकाला रिफ्लेक्टर, विद्युत दिवे नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात दुभाजक दिसत नाही. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. रात्री व पहाटे दोन चारचाकी दुभाजकाला आदळून अपघातांची संख्या १९ झाली आहे.
या अपघातात वाहनाचे नुकसान होऊन तीन जण जखमी झाले आहेत. यात विठ्ठल नथू सोनार रा.जळगाव यांनी फिर्याद दिली. त्यांचा मुलगा दिनेश सोनार याने चारचाकीवर मित्रांना फिरायला मुंबई घेऊन गेला होता. ५ रोजी पहाटे ३ वाजता त्याने मंगरूळ गावाजवळ दुभाजकाला वाहनाची धडक लावल्याने तो स्वत: व त्याचे मित्र कांतीलाल कावडे , दिनेश पाथरीया यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरला म्हणून त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तपास कैलास शिंदे करीत आहेत. तर दुसरी चारचाकी शनिवारी रोजी रात्री दुभाजकावर आदळली.
दहा दिवसांत याच दुभाजकावर चार अपघात झाले आहेत. हा रस्ता धुळे सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत झाला असल्याने अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
फोटो -