शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

जळगाव कारागृहात भुसावळच्या १८ कैद्यांनी उपसले उपोषणाचे हत्यार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:13 IST

कोरेगाव-भीमा दंगलीनंतर भुसावळात झालेल्या आंदोलनात १८ जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा व  संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हा कारागृहात असलेल्या भुसावळच्या १८ कैद्यांनी सोमवारपासून आमरण उपोषण पुकारले आहे.

ठळक मुद्देकलम ३०७ गुन्हा मागे घ्या संभाजी भिडे व एकबोटे यांना अटक करा प्रशासनाला दिली नोटीस

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६ : कोरेगाव-भीमा दंगलीनंतर भुसावळात झालेल्या आंदोलनात १८ जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा व  संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हा कारागृहात असलेल्या भुसावळच्या १८ कैद्यांनी सोमवारपासून आमरण उपोषण पुकारले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे भीम सैनिकांवर हल्ला झाला. त्यामुळे तेथे दंगल उसळली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. भुसावळमध्ये आंदोलनकर्त्यांवर कलम ३०७ चे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात राज्यभर दाखल गुन्ह्यामंध्ये भीम सैनिकांना तत्काळ जामीन मिळाला, भुसावळच्या प्रकरणाता मात्र अद्यापही जामीन मिळालेला नाही. संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत आहे असा आरोप या कैद्यांनी केला आहे.

प्रशासनाला दिली नोटीसविजय उर्फ बाळा सारंग पवार या कैद्याच्या नेतृत्वाखाली १८ कैद्यांनी उपोषण सुरु केले आहे. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी न्यायालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मानवाधिकार आयोग, कारागृह प्रशासन यांना उपोषणाची नोटीस दिली. त्यांनतर आपआपल्या बॅरकमध्ये त्यांनी उपोषण सुरु केले. १२ बॅरेकमध्ये हे कैदी आहेत. सोमवारपासूनच जेवण बंद केल्याने प्रभारी अधीक्षक विलास साबळे यांनी कैद्यांची समजूत घातली, मात्र गुन्हा मागे घेण्याच्या भूमिकेवर कैदी ठाम आहेत.

उपोषणात सहभागी कैदीरवींद्र सुरेश पगारे, सदानंद गजानन खंडेराव, भावेश अनिल भालेराव, नितिन महेंद्र खरे, भगवान बुध्दीमान गायकवाड, श्रावण रमेश देवरे, अमोल साहेबराव बनसोडे, तुषार विद्याधर वाघ, चेतन नरेंद्र आव्हाड, नितीन राजेंद्र वाघ, विशाल संजय कोचुरे, भिमा देवमन इंगळे, आशिष शरद सोनवणे,किशोर सिध्दार्थ सोनवणे, आकाश सुनील सपकाळे, आकाश भिमराव वानखेडे, विशाल पुरुषोत्तम सपकाळे व संगीत बाजीराव खंडेराव यांचा समावेश आहे.