शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तीन दिवसात आढळले १७ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:40 IST

आणखी तीन संशयितांचा मृत्यू, अहवालाची अद्याप प्रतीक्षा

जळगाव : शहरात गेल्या तीन दिवसांमध्ये १७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ हे रुग्ण नवनवीन भागात सापडत असल्याने अधिकच चिंता व्यक्त केली असून शहरात कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे चित्र आहे़ दरम्यान, गुरूवारी सकाळी तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे़एकीकडे अमळेनरात झपाट्याने संख्या वाढत असताना जळगाव मात्र, शांत होते, आता अमळनेर शांत झाल्यानंतर जळगावात रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे़गुरूवारी सकाळी तीन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला़ त्याचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात एक अमळनेर येथील महिला व अन्य एका १८ वर्षीय तरूणाचा समावेश आहे़ तरूण हा झारखंडकडे जात होता़ जळगावच्या आसपास त्याचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे़ त्याला श्वासोश्वासाचा त्रास असल्याने त्याचे स्वॅब घेण्यात आला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे़ यासह अमळनेरातही एका वृद्धाचा मृत्यू झाला.शहरात धोका वाढलाशहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने नवनवीन भागात रुग्ण आढळून आलेले आहेत़ रुग्णांची संख्या ४० वर गेलेली आहे़ केवळ दाट वस्तीनाही तर अपार्टमेंट व उच्चभ्रु वस्तीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ बाधितांच्या संपर्कातीलच नव्हे तर नवनवीन रुग्ण रोज समोर येत असल्याने त्यांची हिस्ट्री काढून सोर्स शोधणे महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे़ गेल्या दोन दिवसात जळगाव शहरात तेरा रुग्ण आढळून आले आहेत़सिंधी कॉलनीतील हाय रिस्क ८ जण निगेटीव्हसिंधी कॉलनीत अमळनेरची हिस्ट्री असलेला एका बाधित रुग्ण आढळून आला होता़ या बाधिताच्या संपर्कातील ८ जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असून एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने ९३ वर्षीय वृद्धाला बुधवारी रात्री कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या बाधित वृद्धांच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव