शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

७४ बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगढ सीमेपर्यंत १६२८ प्रवासी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 20:21 IST

जळगाव : गेल्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याच्या चोरवड सीमेपर्यत ६० बसेसमधून १५१८ प्रवाशी तर छत्तीसगड राज्याच्या देवरी ...

जळगाव : गेल्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याच्या चोरवड सीमेपर्यत ६० बसेसमधून १५१८ प्रवाशी तर छत्तीसगड राज्याच्या देवरी सीमेपर्यत ५ बसेसमधून ११० याप्रमाणे ७४ बसेसमधून १६२८ प्रवाशांना सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतून मंगळवारी एका दिवसात मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमेपर्यंत तर जिल्ह्याबाहेर (नागपूर) ९४६ कामगारांना वैद्यकीय तपासणी करून ४३ एसटी बसेसमधून चोरवड, पळासनेर या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत तर एका बसमधून छत्तीसगड या राज्याच्या सीमेपर्यंत व नागपूरपर्यंत रवाना करण्यात आल्याची माहिती एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली.जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. त्याप्रमाणे संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली. या नागरिकांना फूड पॅकेट देवून रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात आली.४३ बसेसमधून ९४६ प्रवासी रवानायासाठी एसटी महामंडळाच्या जळगाव आगारातून ९ बसेस, जामनेर ३ बसेस, चाळीसगाव २ बस, अमळनेर २ बस, रावेर ९ बसेस, भुसावळ १२ बसेस, एरंडोल १ बस,चोपडा २ बस याप्रमाणे जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतून ४० बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या. तर जळगाव येथून नागपूर येथे जाणाºया प्रवाशांसाठी तीन बसेसमधून ६६ प्रवासी रवाना करण्यात आले. याप्रमाणे आज जिल्ह्यातील ४३ बसेसमधून ९४६ प्रवासी बाहेर जिल्ह्यात व राज्याच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात आले.

 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJalgaonजळगाव