शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जळगावात वीजदरवाढीच्या विरोधात उद्योजक संघटनांतर्फे १५ रोजी लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:37 IST

जळगाव : राज्य सरकारने केलेली वीजदरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टी उद्योगांना मारक ठरत असल्याने सरकारच्या वीजदरवाढ धोरणाच्या विरोधात उद्योग ...

जळगाव : राज्य सरकारने केलेली वीजदरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टी उद्योगांना मारक ठरत असल्याने सरकारच्या वीजदरवाढ धोरणाच्या विरोधात उद्योग संघटनांतर्फे शनिवार १५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती लघु उद्योग भारतीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या ‘एनर्जी कमिटी’चे चेअरमन छबीराज राणे, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव समीर साने, कोषाध्यक्ष देवेंद्र अग्रवाल, सदस्य जतीन ओझा, पाईप मॅन्यूफॅक्चरींग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, इंजियनिअरिंग असोसिएशनचे चंद्रकांत बेंडाळे, इंजियनिअरिंग असोसिएशनचे अरुण बोरोले उपस्थित होते.या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात उद्योग भरभराट नसताना राज्य सरकारने केलेली वीज दरवाढ आणि ‘पॉवर फॅक्टर पॅनल्टी’ उद्योगांना मारक ठरत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी वीज वाढीची घोषणा करत १ सप्टेंबर पासून वीजदरवाढ लागू केली. कोणतीही दरवाढ लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देणे बंधनकारक असताना उद्योजकांचे म्हणणे ऐकून न घेता अन्यायकारक दरवाढ लादण्यात आली आह, यामुळे वीजबिलात १५ ते २० टक्यांची वाढ झाली, असे या वेळी सांगण्यात आले.अधिकाºयांकडून अपशब्दकॅपॅसिटर्सचा वापर करुन फॅक्टर इन्सेन्टीव्ह घेणाºया औद्योगिक वीज ग्राहकांबाबत अधिकाºयांकडून अपशब्द वापरले जातात, त्याचा संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात येत असल्याचे पदाधिकारी म्हणाले.हक्कही मिळेनालॉगिंग पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवण्यासाठी कॅपॅसिटर्सचा वापर महाविरतणतर्फे गेल्या ५८ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यात सप्टेंबर २०१८ च्या निकालामुळे नवीन मुद्दा निर्माण झाला असल्याचे म्हणत कायद्याच्या तरतुदीनुसार उद्योजकांना जी सवलत मिळते तो उद्योजकांचा हक्क आहे. उद्योजकांच्या या हक्काच्या सवलतीवरील व्याजासह किमान १ हजार कोटी रुपये परत (रिफंड) देणे आवश्यक असताना फक्त २६ कोटी देण्यात आले आहे.सुविधेअभावी उद्योग स्थलांतरीतराज्य शासन उद्योजकांना सुविधा देत नसल्यामुळे उद्योग गुजरात व इतर ठिकाणी जात आहेत. शेतीपंपांचा वापर सर्रास दुप्पट दाखवून किमान १५ टक्के गळती लपविण्याचा प्रकार घडत असून किमान १० हजार कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचाराला याद्वारे संरक्षण शासनातर्फे दिले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येवून राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध १५ रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे पदाधिकाºयांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव