शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

152 जणांची चौकशी अन् 40 जणांचे जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 00:37 IST

भादली हत्याकांड : 21 दिवसानंतरही हत्येचा उलगडा होईना

जळगाव : तालुक्यातील भादली बु. येथील हत्याकांड प्रकरणात आतार्पयत पोलिसांनी 152 जणांची चौकशी केली तर 40 जणांचे लेखी जबाब नोंदविले आहे. असे असले तरी पोलिसांच्या हातात अद्यापर्पयत ठोस माहिती हाती आलेली नसली तरी चौघांची हत्या करणारे हे दोन पेक्षा जास्त जण असल्याचा संशय पोलिसांना आहे.20 मार्च रोजी झालेल्या भादली हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. 21 दिवसानंतरही मारेकरी सापडत नसल्याने पोलिसांवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने मारेक:याचे नाव सांगणा:याला पोलीस प्रशासनाने 25 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. चौकशीत प्रतिसाद मिळाल्याने बक्षीसाच्या रकमेत आणखी 25 हजाराची वाढ करण्यात आली. दरम्यान, दररोज 4 ते 5 जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत गावक:यांच्या बोलण्यात वारंवार तफावत आढळून येत आहे. या मुद्यावर केली जात आहे चौकशीभोळे कुटुंबाचा कोणाशी वाद झाला आहे का?, भोळेंच्या प}ीचा विवाह गावातील असल्याने त्याचा काही संबंध आहे का?, भोळे यांच्यामुळे कोणाचे नुकसान झाले आहे, शेती घेणारा व कसणारा यांच्यात कोणाचे नुकसान होणार होते? तसेच चायनीज खाद्य पदार्थाच्या गाडीमुळे कोणाचे  नुकसान, शेतीची थोडीफार रक्कम मिळाली होती व त्याचाही कुठे संबंध येतो का? तसेच चाळीसगाव दरोडय़ाचा संबंध आहे का? या व अन्य  माहितीवर चौकशी केली जात आहे. दरम्यान, मारेक:यांना काही जणांनी पाहिले असल्याचा संशय असून मारेक:यांनी त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली असावी म्हणूनच नाव सांगण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असाही कयास पोलिसांना आहे.फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबकडून घटनास्थळ व परिसराची तपासणी करुन काही नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. घटनेच्या दिवशी ठसे तज्ज्ञांकडूनही ठसे घेण्यात आले तर श्वान पथकाकडूनही तपासणी करण्यात आली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पथके रात्रंदिवस काम करीत आहेत. उशीरा का असेना परंतु, हा गुन्हा आम्ही उघडकीस आणूच. त्यादृष्टीने काही धागेदोरे मिळाले आहेत. नातेवाईकांपासून तर शेजारी व संशयास्पद व्यक्तींची चौकशी करुन जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षकपोलीस अधीक्षकांनी            घेतला आढावापोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी नशिराबाद येथे जाऊन या हत्याकांडाचा पहिल्या दिवसापासून केलेल्या तपासाचा आढावा घेतला. त्यात सहा पथकांनी काय चौकशी केली, त्यात त्यांच्या हाती काय माहिती मिळाली. पुरावे काय मिळाले, अजून गावातून काय माहिती मिळू शकते याबाबत सूचना केल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल व सहायक निरीक्षक राहूल वाघ आदी उपस्थित होते. आतार्पयत 152 जणांची चौकशी व 40 जणांचे लेखी जबाब घेण्यात आल्याचे सुपेकर यांनी सांगितले.