जळगाव : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि पुणे अंध जन मंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू असलेल्या ‘कांताई नेत्रालयाने’ पाच वर्षांत १५ हजार नेत्रशस्त्रक्रियांचा टप्पा पार केला आहे. अलीकडेच काळात नवजात अर्भकांचे दृष्टीदोष दूर करण्यासाठी आधुनिक पद्धतीने निदान व उपचार सेवेची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती नेत्रालयाच्या मेडिकल डायरेक्टर व नेत्रविशारद डॉ. भावना जैन यांनी दिली. कांताई नेत्रालयाचा पाचवा वर्धापनदिन साजरा झाला. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी पत्नी कांताबाई यांच्या स्मरणार्थ नेत्रालयाचा प्रारंभ केला होता. या नेत्रालयात गेल्या पाच वर्षांत १ लाख ८० हजारांवर नेत्र रुग्णांची तपासणी करून उपचारासह इतर आवश्यक सेवा दिली आहे. कांताई नेत्रालयाद्वारे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा, बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा व जालना जिल्ह्यात परतूर अशा चार ठिकाणी पूर्ण वेळ नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.
कांताई नेत्रालयात १५ हजारांवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST