शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी दिलेले १५ व्हेंटिलेटर गायब, भाजप-सेना आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 23:15 IST

खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला.

ठळक मुद्देचोपडा : दोन दिवसात परत आणण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला.  हे व्हेंटिलेटर दोन दिवसात परत आणण्याच्या सक्त सूचना खासदारांनी जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली. चोपडयातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रश्न भाजप व शिवसेना आमने- सामने आल्याचे पहायला मिळाले.

चोपडा तालुक्यात कोरोन रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी खासदार खडसे होत्या. 

भाजपने काही समस्या चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेने प्रशासनाची बाजू सावरुन धरली. यामुळे दोन्ही बाजूचे पदाधिकारी आमने- सामने आल्याचे चित्र होते. 

बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, प्रांताधिकारी सीमा अहिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमित शिंदे उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लातूरकर यांनी कोविडची परिस्थिती विशद केली. 

नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांनी शहरात २८  टीम  द्वारे सर्वेक्षण सुरू असून शिबिरे घेणे सुरू असल्याचे सांगितले.बैठकीत भाजपाचे  पंकज पाटील, गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, आत्माराम म्हाळके तर  शिवसेनेचे  नरेश महाजन, राजेंद्र पाटील, विकास देशमुख, राजाराम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेत जाब विचारला. 

तहसीलदार अनिल गावित, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे , नायब तहसीलदार राजेश राऊळ,  गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यासह अधिकारी व कर्मचारी  आदी उपस्थित होते.

गाव पातळीवर जास्तीत जास्त चाचण्या

चोपडा शहरात एकूण सहा खाजगी हॉस्पिटलमध्ये ४४६रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३८ उपकेंद्रे आहेत.  गाव पातळीवर जास्तीत जास्त दररोज सुमारे तीनशे टेस्टिंग करत असल्याचे सांगितले. आतापर्यंत ग्रामीण भागात १९ हजार ४४ व शहरी भागात १० हजार ६१६  टेस्टिंग झाल्याचे स्पष्ट केले .

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाcorona virusकोरोना वायरस बातम्या