शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे १५ गेट उघडल्याने बोरीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:20 IST

काही गावांचा संपर्क तुटला

पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाच्या वरील भागात मुसळदार पाऊस झाल्याने बोरी नदीला मोठा पूर आला. यामुळे धरणाने २६६.८० मीटरची धोक्याची पातळी ओलांडल्याने धरणाचे १५ गेट उघडण्यात आले. धरणातून ९ हजार २५ क्यूसेस पाणी नदीत सोडले आहे. यामुळे बोरी नदीला मोठा पूर आला असून या पुरामुळे काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.या पुराच्या पाण्यात नदी काठची व पात्रातील मंदिरे पाण्याखाली आली आहेत. प्रचंड पाण्याचा प्रवाहाने मोंढाळे पिंप्री या गावाजवळील साठवण बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. तर पारोळा शहराला पाणी पुरवठा करणारे विचखेडे येथील पंप हाऊसला पुराच्या पाण्याचा वेडा पडला आहे.२४ च्या सायंकाळी बोरी धरणाच्या वरील भागात मालेगाव , निमगूळ ,नासिक आदी ठिकाणी मुसळदार पावसाने हजेरी लावल्याने वरूनच बोरी नदीला मोठा पूर आला व बोरी धरणाने काही मिनिटात धोक्याची पातळी ओलांडली यामुळे २४ च्या रात्री १२.४५ वाजता धरणाचे ९ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ४ हजार ५९ क्यूसेस विसर्ग नदी पात्रातुन सोडण्यात आला.यानंतर बोरी धरणाची धोक्याची पाणी पातळी २६६.८५ मीटर पर्यंत आल्याने रात्री १ वाजता धरणाचे ११ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ४ हजार ९६१ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू झाला.रात्री १.३० वाजत धरणाचे १३ दरवाजे ०.१५ मी ने उघडून ५ हजार ८६३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु झाला.रात्री २ वाजता बोरी धरणाची पाणी पातळी २६६.९२ मीटर पाणी पातळी वाढली. तेव्हा धरणाचे १५ दरवाजे ०.१५ मीटरने ने उघडून ६ हजार ७६५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु झाला.धरणाच्या वरील भागात पाण्याचा प्रवाह खूप जोरात सुरू असल्याने शेवटी रात्री ३ वाजता धरणाचे १० दरवाजे ०.१५ मी व ५ दरवाजे ०.३० मीटरने ने उघडून ९ हजार २५ क्यूसेस मोठा पाण्याचा प्रवाह नदी पात्रात सोडण्यात आला. बोरीला रात्री ३ वाजता मोठा पूर आला. या पाण्याचा प्रचंड प्रवाहाने नदी वरील मोंढाले पिंप्री गावा जवळील साठवण बंधाºयाच्या बाजूचा भराव वाहून गेला.अनेक गावांचा संपर्क तुटलागेल्या ३ ते ४ वर्षा नंतर एकाच रात्रीत धरणाचे १५ गेट उघडण्याची ही पहिली वेळ आहे. नदीला रात्रीतून पूर आल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनी पहाटे उठल्या बरोबर पूर पाहिल्याने आश्चर्य व्यक्त करीत सवार्ना नवल वाटले. बोरी नदीला पूर आल्याने तामसवाडीचा बोळे ,निमगुळ व धुळे या गावांशी संपर्क तुटला. तर टोळी गावालगत नदी पात्रातील विठ्ठलाचे मंदिराला पाण्याचा वेढा पडला.याचबरोबर मोंढाळे व पिंप्री प्र. उ. या दोन गावांचा संपर्क तुटला. पिंप्री प्र. उ. गावाचे नदी काठचे महादेवाचे मंदिर पाण्या खाली आले. पुढे पुलावरुन पाणी वाहत असल्याने बहादरपुर, महाळपूर व शिरसोदे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला असून सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच भिलाली व बहादरपूर, अमळनेर या गावांचाही संपर्क तुटला आहे.पंप हाऊसला पाण्याचा वेढापारोळा शहराला पाणी पुरवठा करणारा पंप हाऊस हा विचखेडे गावा नजीक बोरी नदीच्या काठाला आहे. नदीला प्रचंड पूर असल्याने पंप हाऊसला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. त्यामुळे पंप हाऊसचा संपर्क तुटल्याने पंप हाऊस बंद पडले आहे. यामुळे आता शहराला होणारा पाणी पुरवठा एक दिवसाने उशिराने होणार आहे.