शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात ॲक्टीव्ह रुणांची संख्या १४५० ने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 22:21 IST

जिल्हाधिकारी : बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची वाढती संख्या जळगाव  : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ...

जिल्हाधिकारी : बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची वाढती संख्या

जळगाव  : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्याही १४५० ने कमी झाली असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे,  अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

३४४ वरून ११८२१ पर्यंत

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस अवघे ३४४ ॲक्टीव्ह रुग्ण होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन फेब्रुवारी अखेर ही संख्या २५०५ वर पोहोचली. मार्चअखेर जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या तब्बल ११८०३ वर गेली होती. तर १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुगणांची संख्या ११८२१ या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. 

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येताच जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिम राबविली. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेऊन संशयित व्यक्तींच्या चाचण्याही मोठ्या प्रमाणात वाढविल्या. त्वरीत निदान, त्वरीत उपचारसह जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्याने गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्या वाढत आहे. 

कोरोना संपलेला नाही, सूचनांचे पालन करा

मागील १५ दिवसात जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १४५० ने कमी होऊन ती १०३७१  पर्यंत खाली आली आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे.असे असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे जिल्हावासियांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करुन कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करुन निर्बधांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव