शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीवरील १५ कोटींचा रेल्वेपूल अडकला तांत्रिक समस्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:31 IST

दीड वर्ष उलटूनही गाड्या धावताहेत धीम्या गतीने

जळगाव : भुसावळ-सुरत रेल्वे लाइन वरील जळगाव-पाळधी दरम्यान गिरणा नदीवर बांधण्यात आलेला रेल्वेपूल मोठ्या तांत्रिक समस्येत अडकला आहे. या पूलाच्या पुर्णत्वास दीड वर्ष होऊनही आजदेखील प्रत्येक गाडी पूलावरुन जात असताना काही समस्या उद्भवू नये म्हणून कमी वेगाने धावत आहे.सुरत-भुसावळ रेल्वे लाइनच्या दुहेरीकरणात सुमारे १५ कोटी खर्च करुन गिरणा नदीवर गर्डरयुक्त रेल्वे पूल बांधण्यात आला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी या पूलाचे रेल्वे सुरक्षा आयोगाकडून (सीआरएस) परिक्षण करुन उपयोगासाठी खुला करण्यात आला. मात्र त्याचवेळी हस्तांतरण करताना या पूलावरुन प्रत्येक गाडीला २० किमी प्रतितासाची वेग मर्यादा लादण्यात आली. आज दीड वर्ष होऊनही तिच वेग मर्यादा कायम आहे.जळगावहून सुरतकडे जाण्यासाठी रोज या मार्गाने पॅसेंजर आणि मालगाड्या अशा एकूण ६० रेल्वे गाड्या जात असतात. जळगाव स्थानकाहून गाडी जेव्हा निघते तेव्हा साधारण वेग असतो. मात्र जेव्हाही गिरणा नदीचा पूल जवळ येतो तेव्हा प्रत्येक गाडीचा वेग कमी होऊन फक्त १० ते १५ किमी प्रतितासाच्या वेगाने गाडी धावते.याबाबत जळगाव स्टेशन प्रबंधक संजयकुमार रॉय यांना विचारले असता तांत्रिक समस्येच्या कारणाने रेल्वे सुरक्षेच्या हेतूने प्रत्येक गाडीला या ठिकाणी जाताना वेग मर्यादा लादण्यात आली असल्याचे सांगितले.या पूलाबाबत अधिक माहिती काढली असता खूपच मोठी तांत्रिक समस्या असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण ज्यावेळी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या पुलाचे परिक्षण करण्यात आले त्यावेळी पूल उभारणीत काही त्रुटी आढळल्या आणि त्या कारणाने त्याच वेळी गाड्यांची वेग मर्यादा २० किमी प्रतितास असावी अशा सूचना देण्यात आल्या. शिवाय त्याच वेळी विभागीय कार्यालय, मुंबई कडून मापदंड लावून अहवाल बनवून रेल्वेची संशोधन डिझाइन आणि मानक संस्था (आरडीएसओ) लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे, मात्र सदर पूल उभारणीत कोणती तांत्रिक समस्या आहे याबाबत अजूनही खुलासा आलेला नाही.सीआरएस झाल्यानंतर सदर पूल हस्तांतरण करण्यात आला तेव्हापासूनच वेग मर्यादा लादण्यात आली आहे. मात्र कोणत्या तांत्रिक समस्येने वेग मर्यादा आखण्यात आली आहे, याबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आलेले नाही.-संजयकुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (प.रे.)सदर पूलावर तांत्रिक समस्येच्या कारणाने प्रत्येक गाडीस वेग मर्यादा दिली आहे. शिवाय हा सुमारे ३५० मीटरचा महत्त्वपूर्ण पूल असून मापदंडाचा अहवाल लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे. तेथून अजून खुलासा आलेला नसून खुलासा आल्यानंतर वेग निर्बंध हटविण्यात येईल.- संजय त्यागी, बांधकाम कार्यकारी अभियंता, नंदुरबार

टॅग्स :Jalgaonजळगाव